घरठाणेधावत्या रिक्षावर झाड पडून रिक्षाचालकासह प्रवाशाचा मृत्यू

धावत्या रिक्षावर झाड पडून रिक्षाचालकासह प्रवाशाचा मृत्यू

Subscribe

प्रवासी वाहतूक करणार्‍या एका रिक्षावर अचानक झाड पडल्याची घटना बुधवारी रात्री ठाण्याच्या मासुंदा तलाव परिसरात घडली. यामध्ये रिक्षाचालक अरविंद राजभर (२८) रा. वागळे इस्टेट, रामनगर आणि प्रवासी चंद्रकांत केशव पाटील (५८) रा.नवी मुंबई रबाले या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली.

रिक्षाचालक अरविंद हे बुधवारी रात्री प्रवासी पाटील यांना घेऊन गडकरी रंगायतन येथून स्टेशनकडे निघाले होते. ते डॉ. मूस रोड येथे आले असताना अचानक एक झाड उन्मळून त्यांच्या रिक्षावर पडले. झाड पडल्याने रिक्षा जागेवर थांबली. झाडाच्या वजनाखाली दोघे दबले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच ठाणे महापालिका अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

- Advertisement -

तातडीने रिक्षावर पडलेले झाड हटविण्याचे काम हाती घेत, रिक्षाचालकासह प्रवासी यांना वाचविण्याचा प्रयत्न अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सुरू केला. तोपर्यंत उशीर झाला होता. झाड हटविल्यावर दोघांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अपघाती नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -