घरक्रीडाIPL 2021 : नटराजनवर होणार शस्त्रक्रिया; गुडघ्याच्या दुखापतीमुळे उर्वरित मोसमातून बाहेर

IPL 2021 : नटराजनवर होणार शस्त्रक्रिया; गुडघ्याच्या दुखापतीमुळे उर्वरित मोसमातून बाहेर

Subscribe

मला उर्वरित मोसमात खेळता येणार नसल्याचे दुःख आहे, असे नटराजन म्हणाला.

सनरायजर्स हैदराबादचा डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजनला इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या उर्वरित मोसमाला मुकावे लागणार आहे. नटराजनच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. नटराजनची यावर्षाच्या सुरुवातीला झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली होती. या दौऱ्यात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यातून तो पूर्णपणे सावरू शकला नाही. त्यामुळे त्याला आयपीएल स्पर्धेतून माघार घेणे भाग पडले असून आता त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. भुवनेश्वर कुमार आणि राशिद खान यांच्यासह नटराजन हैदराबादचा प्रमुख गोलंदाज आहे. त्यामुळे तो उर्वरित मोसमाला मुकणे हा हैदराबादसाठी मोठा धक्का आहे.

स्वतःकडून खूप अपेक्षा होत्या

मला उर्वरित मोसमात खेळता येणार नसल्याचे दुःख आहे. मी मागील मोसमात चांगली कामगिरी केली होती आणि त्या कामगिरीच्या आधारे माझी भारतीय संघात निवड झाली होती. त्यामुळे यंदा मला स्वतःकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु, आता माझ्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याने मला उर्वरित सामन्यांना मुकावे लागणार आहे, असे नटराजन म्हणाला.

- Advertisement -

केवळ दोन सामने खेळला

नटराजनला यंदा केवळ दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. तो कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांविरुद्ध खेळला. मात्र, त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले आणि त्याच्या जागी खलील अहमदला संधी मिळाली. बुधवारी हैदराबादने मोसमातील पहिला विजय नोंदवल्यानंतर कर्णधार डेविड वॉर्नरला नटराजनविषयी विचारण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या गुडघ्याला दुखापत असल्याचे वॉर्नर म्हणाला होता.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -