घरदेश-विदेशDelhi Lockdown: दिल्लीच्या लॉकडाऊनमध्ये एक आठवड्यांनी वाढ; CM केजरीवाल यांची घोषणा

Delhi Lockdown: दिल्लीच्या लॉकडाऊनमध्ये एक आठवड्यांनी वाढ; CM केजरीवाल यांची घोषणा

Subscribe

एक आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतरही राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण अजूनही थांबले नाही. दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत असल्याने दिल्लीत परिस्थिती अधिक चिंताजनक होत आहे. अशा परिस्थितीत दिल्ली सरकारने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली असून दिल्लीत एका आठवड्यांसाठी (Lockdown In Delhi) लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले की दिल्लीत एक आठवड्यांनी लॉकडाऊन वाढवण्याला येणार असून त्याचा कालावधी पुढील सोमवारपर्यंत वाढविण्यात आला आहे.

कोरोनाच्या वाढत्या रूग्ण संख्येमुळे दिल्ली सरकारने १९ एप्रिल रोजी एका आठवड्यांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र या लॉकडाऊनमध्ये वाढ करून तो सोमवार ३ मे पर्यंत असणार आहे. केजरीवाल यांनी लॉकडाउन मुदत वाढविताना सांगितले की, दिल्लीत कोरोना बाधितांची संख्या सतत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दिवस वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचा कालावधी एका आठवड्यासाठी वाढविला जात आहे.

- Advertisement -

त्याचबरोबर त्यांनी असेही म्हटले की, राजधानीत अजूनही ऑक्सिजनचा अभाव आहे. दिल्लीत कोरोनाचा कहर कायम आहे. दिल्लीतील लॉकडाऊन पुढील सोमवारी पहाटे ५ पर्यंत वाढविण्यात येणार आहे. लॉकडाऊन दरम्यान पॉझिटिव्हीटी रेट साधारण ३६-३७ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर गेल्या एक-दोन दिवसांपासून कोरोना संसर्गाचे प्रमाण थोडेसे कमी झाले असून आज ते ३० टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले.

- Advertisement -

केजरीवाल पुढे म्हणाले, ‘दिल्लीला ७०० टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे, दिल्लीला केंद्र सरकारकडून ४८० टन ऑक्सिजन वाटप करण्यात आले आणि शनिवारी केंद्र सरकारने १० टन अधिक ऑक्सिजनचे वाटप केले आहे, आता दिल्लीला ४९० टन ऑक्सिजनचे वाटप करण्यात आले आहे. मात्र अद्याप दिल्लीला हा ऑक्सिजन पोहोचला नाही. तर शनिवारी दिल्लीत ३३०-३३५ टन ऑक्सिजन पोहोचले आहे. ‘ ऑक्सिजनच्या व्यवस्थापनासाठी एक पोर्टल तयार करण्यात आले आहे. निर्मात्यापासून ते रुग्णालयातील प्रत्येकाला दर दोन तासांनी ऑक्सिजन स्थितीचा काय आहे, त्याचा अहवाल द्यावा लागणार आहे. केंद्र सरकारचे भरपूर मदत केली जात आहे, यासह केंद्र आणि दिल्ली सरकार एकत्रितरित्या काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -