घरट्रेंडिंग२० बेड्सने कोरोनाविरोधी लढाई सुरू, चारपटीने रूग्णसंख्येत घट करण्याचा 'नंदुरबार पॅटर्न'

२० बेड्सने कोरोनाविरोधी लढाई सुरू, चारपटीने रूग्णसंख्येत घट करण्याचा ‘नंदुरबार पॅटर्न’

Subscribe

आदिवासी बहुल अशा नंदुरबारसारख्या जिल्ह्याच्या अनेक यंत्रणांच्या उपलब्धततेच्या आणि स्त्रोतांच्या निमित्ताने आपल्या अशा स्वतःच्या मर्यादा आहेत. पण जेव्हा एखाद्या जिल्ह्यात संपुर्ण शासकीय यंत्रणा ही टीम म्हणून काम करते तेव्हा अशक्य कोणतीच गोष्ट नसते. नंदुरबार जिल्ह्याने हेच उदाहरण कोरोनासारख्या महामारीच्या संकटात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या आकडेवारीतूनही दाखवून दिले आहे. अवघ्या २२ दिवसात कोरोना रूग्णसंख्येचा घसरत जाणारा आलेख हेच नंदुरबार पॅटर्नचे यश म्हणावे लागेल. याआधी ७ एप्रिलला ११६० असणारी रूग्णसंख्या फक्त तीन आठवड्याच्या कालावधीत २४७ वर आणण्यासाठी नंदुरबारच्या प्रशासनाने दिवसरात्र केलेल्या कामाचे यश आता दिसू लागले आहे. येत्या दिवसात ही परिस्थिती आणखी चांगली होईल असा विश्वास नंदुरबारचे जिल्हाधिकारी असलेल्या डॉ राजेंद्र भारूड यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या महामारीत अनेक संकटांना तोंड देणारा नंदुरबार पॅटर्न या जिल्ह्यातील कमी झालेल्या रूग्णसंख्येच्या निमित्ताने आता पहायला मिळत आहे.

नंदुरबारने अवघ्या २० बेड्सने सुरू केली कोरोनाविरोधी लढाई

अवघ्या २० बेड्सपासून सुरू झालेला कोरोनाच्या महामारी विरोधातील लढा सुरू झाला होता. पण आजच्या घडीला हजारोंच्या संख्येने बेड्सची उपलब्धतता, RTPCR शासकीय टेस्ट लॅब, २७ अॅम्ब्युलन्स आणि ३ ऑक्सिजन प्लॅंट असा कोरोनाविरोधातला फौजफाटा आहे. तर मित्रांमध्येही धावून आलेले एमडी डॉक्टर योगेश्वर चौधरींसारख्या व्यक्तींचीही कमी नाही. परिणामी ७ एप्रिलला असणारा ११६० कोरोना रूग्णांचा आकडा आज गुरूवारी २४७ वर खाली घसरला आहे. नंदुरबारचे जिल्हाधिकारी असलेले डॉ राजेंद्र भारूड यांनी जिल्ह्यासाठी जमवलेल्या अनेक स्त्रोतांचा परिणामच हा कोरोना रूग्णसंख्या कमी होण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.

- Advertisement -

#Good_Trend
Nandurbar Covid Graph,
Work of all Covid warriors and public support helping us…
Hope to see More better situation in coming days.
#CMOMaharashtra
#COVID19

Posted by Dr.Rajendra Bharud IAS on Thursday, April 29, 2021

 

- Advertisement -

कोरोना रूग्णसंख्येचा आकडा कमी जास्त होणे हे कोरोनाच्या महामारीच्या लाटेवरच अवलंबून आहे. पण सातत्याने हा आकडा कमी किंवा जास्त होण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामध्ये टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रिटमेंट याच गोष्टी कोरोनाचा आलेख कमी करण्यासाठी कारणीभूत ठरल्या असे भारूड यांचे मत आहे. नंदुरबारमध्ये तुलनेने अनेक स्त्रोतांच्या मर्यााद असल्या तरीही संपुर्ण प्रशासनाने टीम म्हणूनच काम केल्याने त्याचे परिणाम आता कोरोना रूग्णसंख्येत झालेल्या कमालीच्या कपातीने दिसत आहे. संपुर्ण कोरोना वॉरियर्स, नागरिकांचा सहभाग यामुळेच हे शक्य झाले आहे असे भारूड यांनी फेसबुक पोस्टमध्ये नमुद केले आहे. तर येणाऱ्या दिवसात आणखी चांगली परिस्थिती निर्माण होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. नंदुरबारमध्ये अनेक सामाजिक संघटनांचाही हातभार आहे, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्समुळे सातपुड्यासारख्या डोंगराळ भागात धडगाव, मोलगी, जमाना आणि तोरणमाळ यासारख्या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा होणे शक्य होणार आहे.

काय म्हणतात डॉ भारूड ?

मागील वर्षी कोविडच्या सुरुवातीला 20 बेड पासून सुरू झालेला आपला जिल्हा, आज १२८९ हॉस्पिटल बेड, कोवीड केअर सेंटरला १११७ बेड, ग्रामीण रुग्णालय,PHC, शाळा, हॉस्टेल् समाज मंदिर येथे 5620 Beds उपलब्ध आहेत. आज नंदुरबार जिल्ह्यात स्वतःची स्वतंत्र 1500 RTPCR टेस्ट असेल एवढी Government Lab ची Cpacity आहे. यामागील तीन महिन्यात 27 ॲम्बुलन्स आल्या, स्वतःचे सरकारी 3 ऑक्सीजन प्लांट आणि खाजगी 2 चालू आहेत. अजून दोन प्लांट प्रगतीपथावर आहेत, Liquid Tank बसवण्याचे काम सुद्धा चालू आहे, लसीकरणासाठी गावोगावी कॅम्प चालू आहेत, कोवीडच्या नवीन केसेसची संख्या ४ पटीने कमी झाली आहे, प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सोबत आणि जनतेचा विश्वास हे नंदुरबार साठी खूप मोलाचे आहे. असेच सोबत काम करूया आणि जे काही चांगलं शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करूया.

भूमिपुत्राला जिल्हाधिकाऱ्यांचा एक फोन, डॉक्टरने सोडली मुंबई

नंदुरबार जिल्ह्यात एमडी डॉक्टर ची कमतरता होती, त्यावेळी जिल्ह्याचा भूमिपुत्र आणि डॉ राजेंद्र भारूड यांचा कॉलेजचा मित्र डॉक्टर योगेश्वर चौधरी MD Medicine यांना जिल्हाधिकाऱ्यांनी संपर्क साधला. तसेच विनंती केली की तुझी गरज मुंबईपेक्षा नंदुरबारला जास्त आहे. त्यांनी तात्काळ होकार दिला आणि गेल्या काही दिवसापासून नंदुरबार येथे स्वच्छेने सिविल रुग्णालयाला सेवा देण्यासाठी सुरूवात केली. काही भूमिपुत्र जर परत आपल्या जिल्ह्यात येत असतील त्यांच निश्चितच स्वागत आहे. ज्या डॉक्टर्स नर्सेस यांना नंदुरबार मध्ये काम करायची इच्छा असेल त्यांनी जरूर यावे असेही आवाहन भारूड यांनी केले आहे. त्यासोबतच डॉक्टर संतोष पवार एमडी मेडिसिन जे पुणे येथे काम करत होते, जिल्हा रुग्णालय येथे कोरोना पेशंटच्या रुग्णांची उपचारासाठी रुजू झाले आहेत अशीही माहिती भारूड यांनी दिली आहे. आपल्या जिल्ह्याची वैद्यकीय परिस्थिती बघता, डॉक्टरांची गरज बघता सर्व नंदुरबारकर यांची काळजी घेण्यासाठी आणि कोविड विरुद्ध लढण्यासाठी ते सज्ज आहेत, असेही त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -