घरताज्या घडामोडीगोकुळ संघ निवडणूक, विरोधी आघाडी सतेज पाटील गटाचे ४ उमेदवार विजयी, सत्ताधारी...

गोकुळ संघ निवडणूक, विरोधी आघाडी सतेज पाटील गटाचे ४ उमेदवार विजयी, सत्ताधारी गटाला मोठा धक्का

Subscribe

शौमिका महाडिक आणि अनुराधा महाडिक यांच्यात चुरस

गोकुळ दूध संघाच्या निवडणूका २ मे रोजी घेण्यात आल्या असून आज ४ मे रोजी मतमोजणी आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोकूळ दूध संघाची निवडणूक अटितटीची ठरली आहे. दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार सतेज पाटील व मुश्रीफ गटाचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे सत्ताधारी आघाडीला चांगलाच धक्का बसला आहे. गोकुळ दूध संघात ५ पैकी ४ राखीव प्रवर्गातील जागांवर विरोधी आघाडी म्हणजेच पाटील आणि मुश्रीफ गटाचा विजय झाला आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांना एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे. सध्या अजूनही मतमोजणी सुरु असून येत्या काही तासात संपूर्ण निकाल हाती येईल.

गोकुळ दूध संघाच्या निवडणूकीसाठी एकूण २१ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात होते. त्यातील १६ जागांवरील मतमोजणी सुरु असुन राखीव प्रवर्गाचे निकाल हाती आले आहेत. सत्ताधारी महादेवराव महाडिक यांच्या गटाला ५ जागांवर धोबीपछाड देण्यात आला आहे. सत्ताधारी आमदार महादेवराव महाडिक आणि विरोधी आघाडी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्ये काटे की टक्कर झाली आहे.

- Advertisement -

राखीव प्रवर्गात पाटील गटाच्या माजी आमदार सुजित मिणचेकर,अमरसिंह पाटील,बयाजी शेळके व अंजना रेडेकर यांनी विजय मिळवला आहे. तर एक जागा सत्ताधारी गटातील शौमिका महाडिक यांना मिळाली आहे. शौमिका महाडिक आणि अनुराधा महाडिक यांच्यात चुरस पाहायला मिळाली होती. अखेर शौमिका महाडिक यांनी ४६ मतांनी विजय मिळवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी तालुका पातळीवर निवडणुक घेण्यात आली आहे. एकूण ३५ केंद्रांवर मतदान करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे गर्दी होऊ नये यासाठी मतदान केंद्र विभागली गेली होती.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -