Monday, May 10, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कोरोनाकाळात ट्विटरवर मदत हवेय? भारतीयांना मदतीसाठी ट्विटरचा फॉरमॅट जाहीर

कोरोनाकाळात ट्विटरवर मदत हवेय? भारतीयांना मदतीसाठी ट्विटरचा फॉरमॅट जाहीर

Related Story

- Advertisement -

कोरोना महामारीच्या संकटात भारतात सध्या ट्विटरचा वापर करून अनेक रुग्णांचे नातेवाईक मदतीचे आवाहन करत आहेत. त्यामध्ये बेड्सच्या उपलब्धततेपासून ते रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजनची मागणी आणि Ambulanceची गरज अशा अनेक गोष्टींसाठी ट्विटरचा वापर केला जात आहे. त्यामुळेच ट्विटरनेही भारतातील या ट्विट्सच्या ट्रेंडची दखल घेतली आहे. अनेक युजर्स हे ट्विटरचा वापर करत असल्याचे ट्वीट ट्वीटर इंडियाकडून करण्यात आले आहे. ट्विटरवर मदतीची मागणी करतानाच ट्विटरने जबाबदारीने या गोष्टी करण्यासाठी काही टिप्स जाहीर केल्या आहेत. त्यामुळेच मदत लवकर पोहोचतानाच ती योग्य ठिकाणी पोहोचावी असा उद्देश ट्विटरने व्यक्त केला आहे.

काय आहेत ट्विटरच्या टीप्स?

- Advertisement -

जेव्हा मदतीचे आवाहन करणारे ट्वीट करत आहात तेव्हा एक पॅटर्न सेट करा. त्यामध्ये महत्वाच्या गोष्टी नमुद करा, खालील फॉरमॅटमध्ये ट्वीट अपेक्षित असल्याचे ट्विटरने स्पष्ट केले आहे.
१. ट्विटमध्ये #COVIDIndiaSOS नमुद करा
२. गरजू व्यक्तीचे ठिकाण (शहरातील भागाचे नाव)
३. मदतीचे स्वरूप (हॉस्पिटलायजेशन, ऑक्सिजन, राहण्याची व्यवस्था, औषधे आणि अन्न)

जेव्हा या मदतीची पुर्तता होईल, तेव्हा हे ट्विट डिलिट करायला विसरू नका
तुम्हाला ज्या स्वरूपाची मदत हवी आहे, त्यानुसारच हॅशटॅगचा वापर करा
#COVID19IndiaHelp
#COVIDEmergencyIndia
#COVIDIndiaSOS


- Advertisement -

हेही वाचा – क्या बात है! महाराष्ट्रातील ‘हे’ गाव कोरोनामुक्त, एक महिन्यापर्यंत एकही रुग्ण नाही


 

- Advertisement -