घरमुंबईकोरोनाने वाढवली मुंबईकरांची चिंता, 72 हजार कॉल्स धडकले ‘बीएमसी-एमपॉवर वनऑनवन’ हेल्पलाईनवर

कोरोनाने वाढवली मुंबईकरांची चिंता, 72 हजार कॉल्स धडकले ‘बीएमसी-एमपॉवर वनऑनवन’ हेल्पलाईनवर

Subscribe

मानसिक आरोग्य ही कायमच चिंतेची बाब असते, परंतु गेल्या वर्षभरात तिला अधिकच गंभीर स्वरूप आलेले आहे आणि लोकांनीही आपला संघर्ष व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एमपॉवर’ने सुरू केलेल्या ‘बीएमसी-एमपॉवर वनऑनवन या चोवीस तास कार्यरत असणाऱ्या मानसिक आरोग्य हेल्पलाईनला (1800120820050) एप्रिल 2020 मध्ये सुरू झाल्यापासून 72 हजाराहून अधिक कॉल्स प्राप्त झाले आहेत, अशी माहिती आज येथे देण्यात आली. भारतीय मानसिक आरोग्यसेवेत प्रणेती असणाऱ्या ‘एमपॉवर’ने ‘#LetsChat1on1’ ही मानसिक आरोग्य चॅट सेवा तिच्या #LetsTalk1on1 या हेल्पलाईन सेवेच्या विस्तारात सुरू केली आहे. ही चॅटसेवा https://mpowerminds.com/chat-with-us या लिंकद्वारे वापरता येऊ शकते. भारताची मानसिक आरोग्याची समस्या जसजशी वाढत जात आहे, तसतसे अस्तित्त्वात असलेल्या समस्येचे, विशेषत: कोविड1-9 च्या उद्रेकाचे, ‘हेल्पलाइन ब्रेकडाउन’वरून आकलन होत आहे. भारतीयांना भेडसावणाऱ्या प्रमुख मानसिक समस्यांमध्ये, चिंता व तणाव यांचे प्रमाण जास्त आहे. हेल्पलाईनला आलेल्या कॉल्समध्ये या तक्रारींचे प्रमाण 25 टक्के आहे. प्रामुख्याने करिअरशी संबंधित प्रश्न, कामाच्या ठिकाणी असलेल्या समस्या, कोविड-19 च्या आजाराला बळी पडण्याचा धोका, आरोग्याचे प्रश्न आणि परीक्षांचा ताण यांच्याशी संबंधित या चिंता आहेत. 10 टक्के कॉल हे उदासीनता, ढासळलेली मानसिकता, दु:खाची भावना आणि नैराश्य यांसंबंधी होते. 8 टक्के कॉल नातेसंबंधांविषयी होते. हे कॉल करणाऱ्या व्यक्ती आपले भागीदार किंवा कुटुंबातील सदस्यांबाबत चिंतांग्रस्त होते. शेतकरी, शिक्षक, कॉर्पोरेट कर्मचार्‍यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत, सर्व स्तरातील लोकांना ‘एमपॉवर’च्या प्रशिक्षित आणि अनुभवी मानसिक आरोग्य समुपदेशकांची मदत हवी होती.

या हेल्पलाईनवर कॉल करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण 70 टक्के असून महिलांचे प्रमाण 30 टक्के होते. महिलांच्या तुलनेत पुरुष स्वतःला जास्त व्यक्त करीत नाहीत, हा समज दूर होत असल्याचे यातून दिसून येते. हेल्पलाईनवर कॉल करणाऱे 18 ते 85 अशा सर्व वयोगटातील असले, तरी त्यातील बहुतांश व्यक्ती 26 ते 40 वर्षे या वयोगटातील होत्या. त्यांचे प्रमाण 53 टक्के होते. तसेच 18 ते 25 वर्षे या वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण 28 टक्के होते. 55 वर्षांपुढील वयाच्या व्यक्तींचे प्रमाण यात सर्वात कमी, म्हणजे 5 टक्के होते. महाराष्ट्रात हेल्पलाईनला मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक आणि सोलापूर या शहरांमधून मोठ्या प्रमाणात कॉल आले. ही हेल्पलाईन सुरुवातीला महाराष्ट्र राज्यामध्ये मानसिक आरोग्याच्या समस्येवर लक्ष ठेवण्यासाठी सुरू करण्यात आली असली, तरी दिल्ली, कोलकाता, लखनऊ आणि बंगळुरूसह देशातील इतर शहरांमधूनही तीवर कॉल आले, अशा नोंदी आहेत.देशातील मानसिक आरोग्याच्या स्थितीवर प्रकाश टाकताना, ‘एमपॉवर’च्या हेल्पलाइनच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे, की कोविडची पहिली लाट आली असताना ज्या वेळी रुग्णांचे प्रमाण अगदी उच्च स्तरावर गेले होती, त्याचवेळी हेल्पलाईनवर मोठ्या प्रमाणावर कॉल आले. विशेषतः, एप्रिल व मे 2020 या महिन्यांमध्ये कॉल्सची संख्या वाढली व ते प्रमाण एकुणांत 40 टक्के इतके होते. या हेल्पलाईनवर सकाळी ११ ते सायंकाळी 7 या वेळेत सर्वात जास्त कॉल्स येतात. याचा अर्थ, एखाद्याने सकाळी लवकर किंवा रात्री कॉल केला तर त्याचा मानसिक आरोग्य सल्लागारांशी सहज संपर्क होऊ शकेल.सध्या टाळेबंदीमुळे लोकांना घरी राहण्यास भाग पडले आहे, अशा वेळी त्यांना समोरासमोर / ऑनलाइन थेरपीसाठी उपस्थित राहण्यासाठी किंवा कोणत्याही हेल्पलाइनवर कॉल करण्यासाठी नेहमीच खासगी वेळ आणि जागा सापडते असे नाही. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सेवा अधिक सुलभतेने मिळण्यासाठी ‘एमपॉवर’ने आपल्या Https://mpowerminds.com या वेबसाईटच्या माध्यमातून ‘#LetsChat1on1’ ही एक मानसिक आरोग्य चॅट सेवा सुरू केली आहे. ही मोफत सेवा अनुभवी मानसशास्त्रज्ञांद्वारे हाताळली जाते. ती तातडीच्या मदतीसाठी 24×7 उपलब्ध असून 18 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला तिचा लाभ घेता येईल.

- Advertisement -

हेल्पलाइनला मिळालेल्या प्रतिसादाबाबत आणि ‘#LetsChat1on1’ या सेवेच्या सादरीकरणाबाबत ‘एमपॉवर’च्या संस्थापिका व अध्यक्षा नीरजा बिर्ला म्हणाल्या, “मानसिक आरोग्य ही कायमच चिंतेची बाब असते, परंतु गेल्या वर्षभरात तिला अधिकच गंभीर स्वरूप आलेले आहे आणि लोकांनीही आपला संघर्ष व्यक्त केला आहे. ‘बीएमसी-एमपॉवर 1-1’ हेल्पलाईनद्वारे आम्ही भारतीयांच्या व्यथा ऐकल्या आहेत आणि त्यांच्या दबलेल्या भावना व्यक्त करण्यास एक माध्यम मिळवून दिले आहे. गेल्या वर्षभरातील महत्त्वपूर्ण निष्कर्षांकडे पाहता, देशभर मानसिक आरोग्यसेवा सर्वाना उपलब्ध व्हावी, हा आपला संकल्प दृढ करण्यासाठी आणि प्रत्येक नागरीक त्याला किंवा तिला आवश्यक असलेल्या मदतीची अपेक्षा करू शकेल हे सुनिश्चित करण्यासाठी, या निष्कर्षांचा उपयोग करण्याचे आमचे ध्येय आहे. आम्हाला आनंद आहे की जवळपास 72,000 लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आमच्या #LetsTalk1on1 हेल्पलाइनवर संपर्क साधला. आमच्या नवीन ‘# LetsChat1on1’ च्या चॅट सेवेचा वापर करण्यास आणि त्याचा लाभ घेण्यास आम्ही अधिकाधिक लोकांना उद्युक्त करीत आहोत; खासकरुन सध्याच्या कठीण दिवसांमध्ये आपण संघर्ष करीत असताना हे व्यक्त होणे आवश्यक आहे.”


हे हि वाचा – वय अवघे ३० वर्षे वाचवले ३,१०० प्राण, ऑक्सीजन पुरवणारा देवदूत

- Advertisement -

 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -