घरताज्या घडामोडीबीडमध्ये कोरोनाचा उद्रेक, जिल्हाधिकाऱ्यांकडून ५ दिवसीय कडकडीत लॉकडाऊनची घोषणा

बीडमध्ये कोरोनाचा उद्रेक, जिल्हाधिकाऱ्यांकडून ५ दिवसीय कडकडीत लॉकडाऊनची घोषणा

Subscribe

सकाळी ७ ते १० या वेळेतच भाजीपाला आणि फेरीवाल्यांना परवानगी

बीडमध्ये कोरोना परिस्थिती चिंताजनक झाली आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या आणि कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बीडमध्ये कडकडीत लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ५ दिवसीय म्हणजेच १२ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. बीडमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद असणार आहेत. तसेच सकाळी ७ ते १० या वेळेतच भाजीपाला आणि फेरीवाल्यांना परवानगी देण्यात आली आहे.

बीडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वारंवार प्रशासनाकडून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असून नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहेत. विनाकारण घराबाहेर पडत आहेत. यामुळे बीडमध्ये कोरोनाबाधितांची साखळी तुटत नाही आहे. बीडमध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी बैठक घेत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्थानिक पातळीवर उपापयोजन करण्यात येत आहेत.

- Advertisement -

बीडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे अखेर जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील अस्थापनांना परवानगी देण्यात आली आहे. सकाळी ७ ते १० या वेळेत भाजीपाला आणि फेरीवाल्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच संचारबंदी असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच बॅंकेचे व्यवहार १० ते १२ या वेळात करण्याची मुभा देण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात सध्या १५ हजार ५५० कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत एकुण ६४ हजार ९१३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये ४८ हजार ३०१ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १०५३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बीडमध्ये कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याने कडक लॉकडाऊन करण्यात येत आहे. तर जिल्ह्यात दिवसाला १०० रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि कोरोना मृत्यूचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी कडकडीत लॉकडाऊनचे आदेश जारी केले आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -