घरCORONA UPDATECorona Cases: देशात २४ तासांत पहिल्यांदाच ४ हजाराहून अधिक मृत्यू, तर रुग्णसंख्या...

Corona Cases: देशात २४ तासांत पहिल्यांदाच ४ हजाराहून अधिक मृत्यू, तर रुग्णसंख्या ४ लाख पार

Subscribe

देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढत होत असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. एवढंच नाही तर देशातील मृत्यूदरातही मोठी वाढ झाली आहे. यात देशात गेल्या २४ तासांत पहिल्यांदाच ४ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आज ४ हजार १८७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर रुग्णसंख्येत सलग चौथ्या दिवशी ४ लाख १ हजार ७८ नव्या बाधित रुग्णांची भर पडली आहे. तसेच ३ लाख १८ हजार ६०९ कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४ लाख १ हजार ७८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील आत्तापर्यंतची रुग्णसंख्य़ा ही २ कोटी १८ लाख ९२ हजार ६७६ वर पोहचली आहे. तर आज ४ हजार १८७ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे देशात आत्तापर्यंत २ लाख ३८ हजार २७० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचा फैलाव वाढत असताना दिलासाजनक बाब म्हणजे आत्तापर्यंत १ कोटी ७९ लाख ३० हजार ९६० रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या देशात ३७ लाख २३ हजार ४४६ इतके सक्रिय रुग्ण असून त्यांचावर उपचार सुरु आहेत. यासह देशभरात कोरोना लसीकरण मोहिम वेगात सुरु असून आत्तापर्यंत १६ कोटी ७३ लाख ४६ हजार ५४४ नागरिकांना कोरोनाची लस दिली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -