घरमनोरंजन“मलाही चांगले उपचार मिळाले असेत तर.......वाचलो असतो”, मृत्यूपूर्वी राहुल वोहारची निराशदायक पोस्ट

“मलाही चांगले उपचार मिळाले असेत तर…….वाचलो असतो”, मृत्यूपूर्वी राहुल वोहारची निराशदायक पोस्ट

Subscribe

राहुलची कोरोनाचाचणी पॉझिटिव्ह आली होती.

अभिनेता राहुल वोहराचे कोरोनाने निधन, मृत्यूच्या एकदिवस आधी शेअर केली निराशदायक पोस्ट
अभिनेता राहुल वोहरा याचा रविवारी ९ मे रोजी कोरोनामुळे दिल्लीतील रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या एक दिवस आधी राहुल याने योग्य उपचार न मिळाल्याबद्दल निराशजणक पोस्ट शेअर केली होती. “मलादेखील चांगली ट्रिटमेंन्ट मिळाली असती तर मीही वाचलो असतो, तुमचा राहुल वोहरा” असे म्हणत निराशादायक पोस्ट राहुलने त्याच्या फेसबुकवर शेअर केली होती. या पुढे तो म्हणाला, “मी पुन्हा जन्म घेईल आणि चांगले काम करुन दाखवेल माझ्यात अजून लढण्याची हिंमत नाही आहे, आता मी हारलो असून मी सर्व धैर्य गमावले आहे” राहुलची कोरोनाचाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली होती. दरम्यान त्याने ऑक्सिजन बेडसाठी एक असहाय्य विनंतीदेखील केली होती.

Youtuber Rahul Vohra is no more, asking for good treatment from the  government till the end » khabreelal

- Advertisement -

अरविंद गोवरनेही यासंदर्भात दु:ख व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे, “राहुल वोहरा आपल्यातून निघून गेला आहे, माझा प्रतिभावान अभिनेता आता नाही. कालच त्याने मला सांगितले की, बरे उपचार मिळाल्यास त्यांचे प्राण वाचू शकले असते. काल संध्याकाळी त्याला आयुष्मान, द्वारका येथे हलविण्यात आले पण आम्ही त्याला वाचवू शकले नाही. कृपया आम्हाला माफ कर आम्ही सर्व तुमचे गुन्हेगार आहोत. माझा शेवटचा आदर. ” असे म्हणत भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

- Advertisement -

मुळचा उत्तराखंडचा असलेला राहुल वोहार हा सोशल मीडियावर बराच लोकप्रिय होता त्याचे फेसबुकवर १.९ मिलिअनेपेक्षा जास्त चाहते होते.


हे वाचा-  Mother’s Day निमित्त करिनाने चाहत्यांने दाखवली तिच्या दुसऱ्या बाळाची झलक, पहा फोटो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -