घरमुंबईकोरोनानंतर आता मुंबईवर म्युकरमायकोसिसचे संकट

कोरोनानंतर आता मुंबईवर म्युकरमायकोसिसचे संकट

Subscribe

महापालिकांच्या रुग्णालयांमध्ये आढळले तब्बल 111 रुग्ण

मुंबईत अजून कोरोनाचे थैमान सुरूच असून त्यातच आता म्युकरमायकोसिसचे संकट वाढू लागले आहे. या आजारात रुग्णांच्या नाकामध्ये काळ्या रंगाची बुरशीची वाढ होऊ लागते आणि तिच्यावर वेळीच उपचार केले नाहीत तर ती डोळे तसेच मेंदूपर्यंत जाऊन पोहोचते. मुख्य म्हणजे आजार जास्त बळावला तर रुग्णाचे डोळे काढावे लागणे किंवा मृत्यूसुद्धा संभवत असल्याने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. मुंबईत या आजाराचे एकशे अकरा रुग्ण आढळल्याची माहिती पुढे आलेली आहे. परंतु यातील बहुतेक रुग्ण हे मुंबई बाहेरील असल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला आहे.

भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी बुधवारच्या स्थायी समिती सभेत उपस्थित केलेल्या म्युकरमायकोसिस आजाराबाबत माहितीच्या मुद्यावर अतिरिक्त आयुक्त सुरेश यांनी ही माहिती दिली. मुंबई शहरात 111 म्युकरमायकोसिस रुग्ण आढळले असून त्यापैकी शीव रुग्णालय 32, केईएम रुग्णालय 34, नायर रुग्णालय38आणि कूपर रुग्णालय येथे 7 रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी बहुतांश रुग्ण मुंबई बाहेरील आहेत. सदर आजार बुरशीजन्य आहे. परंतु संसर्गजन्य असल्याचे आढळून आलेले नाही. कोविड रुग्णालयातील डॉक्टरांना याबाबत प्रशिक्षण दिलेले आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा गट तयार केलेला आहे. आजार होऊ नये, झाल्यास उपचार पद्धती उपकरणे, औषधे याबाबत उपचार निश्चित करण्यात आले असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरू केली आहे.

- Advertisement -

रोग टाळण्यासाठी उपाययोजनांची खबरदारीची माहिती सर्व रुग्णालयात दिली आहे. कोविड उपचार पद्धतीचा अतिवापर टाळावा. विशेषतः डायबेटिक रुग्णांबाबत विशेष काळजी घ्यावी. म्युकरमायकोसिस या आजारावर वापरण्यात येणार्‍या ‘एम्फो टेरेसीन बी’ इंजेक्शन व इतर औषधे खरेदी करण्यासाठी महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणामार्फत प्रक्रिया सुरू केलेली आहे. तोपर्यंत रुग्णालयांना स्थानिक स्तरावर खरेदी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांना 8 ते12 आठवडे निरीक्षणाखाली ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, अशी माहिती काकाणी यांनी सभागृहाला दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -