घरताज्या घडामोडीभारत लोकसंख्येत २०२७ पूर्वीच चीनला मागे टाकणार, UNच्या अंदाजाआधीच लोकसंख्यावाढ

भारत लोकसंख्येत २०२७ पूर्वीच चीनला मागे टाकणार, UNच्या अंदाजाआधीच लोकसंख्यावाढ

Subscribe

संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार २०२७ पूर्वीच भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होईल, असे लोकसंख्या संबंधीत अभ्यासाचे चीनी तज्ज्ञांनी म्हटले आहे. गेल्या काही वर्षांत चीनमध्ये जन्मदर कमी होत आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने सन २०१९ मधल्या आपल्या अहवालात म्हटले होते की, भारताची लोकसंख्या आतापासून ते २०५० च्या दरम्यान सुमारे २७ कोटी ३० लाख लोकांची वाढण्याची शक्यता आहे. तसेच २०२७ पर्यंत भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल, असा अंदाज अहवालात वर्तविण्यात आला होता. अहवालानुसार, या दशकाच्या अखेरीस भारत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असेल. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार, २०१९मध्ये भारताची लोकसंख्या जवळपास १.३७ अब्ज होती तर चीनची १.४७ अब्ज होती. चीनची लोकसंख्या २०१९च्या तुलनेत ०.५३ टक्क्यांनी वाढून १.४११७८ अब्ज झाली आहे. जरी लोकसंख्या वाढीचा हा दर देशात सर्वात कमी आहे. २०१९मधील लोकसंख्या १.४ अब्ज होती.

- Advertisement -

चीन सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश अद्यापही आहे. तथापि अधिकृत अंदाजानुसार, पुढच्या वर्षापर्यंत चीन लोकसंख्येत घट होऊ शकते आणि ज्यामुळे कामगारांची कमी होईल आणि उपभोग पातळीत घट होऊ शकते. अशा परिस्थितीत याचा परिणाम देशाच्या आर्थिक व्यवस्थेवरही होईल. चीन सरकारने मंगळवारी जाहीर केलेल्या सातव्या राष्ट्रीय जनगणनेच्या आकडेवारीनुसार, सर्व ३१ प्रांतांमध्ये, स्वायत्त क्षेत्र आणि नगरपालिकांसह चीनची लोकसंख्या १.४११७८ अब्ज झाली आहे, जी २०१०च्या आकडेवारीपेक्षा ५.८ टक्के किंवा ७.२ कोटीहून जास्त आहे.

चीन सरकारचे वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने बुधवारी लोकसंख्या अभ्यासक चीन तज्ज्ञांच्या हवालाने म्हटले की, भारताची लोकसंख्या २०२७ सालापूर्वीच चीनपेक्षा अधिक असेल. येणाऱ्या वर्षात चीनच्या प्रजनन दरात घट होण्याची शक्यता व्यक्त करत तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला की, उच्च प्रजनन दरासह भरात २०२३ किंवा २०२४ पर्यंत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होईल.

- Advertisement -

पेकिंग विद्यापीठाचे समाजशास्त्रचे प्राध्यापक लू जिहुआ म्हणाले की, घट होण्यापूर्वी २०२७ पर्यंत चीनची लोकसंख्या शिगेला पोहोचू शकेल. चीन प्रजनन दरात घट होण्यासाठी जोखमिचा सामना करत आहे कारण देशात सन २०२० मध्ये १ कोटी २० लाख मुलांचा जन्म झाला आणि आतापर्यंत सलग चौथ्या वर्षी जन्मदरामध्ये घट नोंदविण्यात आली आहे.

ग्लोबल टाईम्सला पेकिंग विद्यापिठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक लियांग जियानझेंग यांनी सांगितले की, येणाऱ्या वर्षात देखील चीनच्या जन्मदरात घसरण सुरुच राहिल आणि हा जगातील सर्वात कमी दर असेल. सन २०१६ मध्ये चीनने लोकसंख्येशी संबंधित संकट लक्षात घेता ‘वन चाईल्ड पॉलिसी’वर रोख लावून दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी दिली होती. पण लोकसंख्या रोखण्यासाठी त्याचा फारसा परिणाम झाला नाही.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -