घरमहाराष्ट्रजावयाचा पत्नीसह सासू-सासऱ्यावर हल्ला; सासऱ्याचा मृत्‍यू

जावयाचा पत्नीसह सासू-सासऱ्यावर हल्ला; सासऱ्याचा मृत्‍यू

Subscribe

इचलकरंजीमध्ये कौटुंबिक वादात जावयाने पत्नीसह सासू-साऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून शोध सुरु आहे.

कोल्हापूरात कौटुंबिक वादातून जावयाने पत्नीसह सासू-साऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजीतील जवाहरनगर परिसरातील कोरवी गल्लीमध्ये ही घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी आणि सासू गंभीर जखमी झाली आहेत. कोल्हापूरात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. आरोपी पती फरार झाला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल झाली असून तपास सुरु आहे.

सासरा जागीच ठार

हल्ल्यात सासरा जागीच ठार

जवाहरनगर परिसरातील कोरवी गल्लीमध्ये राहणारे धोंडीराम रावण यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलीवर जावई अनिल पाटील याने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये धोंडीराम रावण जागीच ठार झाले. तर सासू राधा रावण, पत्नी रुपाली पाटील गंभीर जखमी झाले आहेत. तर रुपाली यांची छोटी मुलगी या हल्ल्यात थोडक्यात बचावली आहे. दोघींवर सीटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. हल्ल्यानंतर आरोपी अनिल पाटील फरार झाला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून फरार आरोपीचा शोध सुरु आहे.

- Advertisement -

कौटुंबिक वादातून घडली घटना

कौटुंबिक वादातून ही घटना घडली आहे. धोंडीराम यांची मुलगी रुपालीचा विवाह १० वर्षापूर्वी अनिल पाटील याच्यासोबत झाला होता. रुपाली आणि अनिल यांना पाच वर्षाची मुलगी आहे. या दोघांमध्ये सतत वाद होत होते. रविवारी देखील दोघांमध्ये वाद झाले. त्यामुळे रुपाली पाटील माहेरी निघून गेली. रुपालीचे माहेर आणि अनिल पाटीलचे घर जवळजवळच आहे. या भांडणाचा राग मनात ठेवत अनिल पाटील रात्री रुपालीच्या माहेरी गेला आणि त्याने सासू-सासरे आणि रुपालीवर हल्ला केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -