घरताज्या घडामोडीहृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी मध्यमवयीन स्रियांनी नियमितपणे तपासा ब्लडप्रेशर, पहा काय म्हणाले...

हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी मध्यमवयीन स्रियांनी नियमितपणे तपासा ब्लडप्रेशर, पहा काय म्हणाले अभ्यासक

Subscribe

डॉक्टरांचा सल्ला घेऊन काही नियमित अंतराने ब्लडप्रेशरची पातळी तपासणे महत्त्वाचे

आपल्याकडे स्रिया त्यांच्या आरोग्याची फारशी काळजी घेताना दिसत नाहीत. त्यामुळे वयाच्या चाळीशीनंतर स्रियांना अनेक आजारांना सामोरे जावे लागले. त्यामुळे आधीपासूनच स्रियांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. स्रियांनी वयाच्या चाळीसीच्या सुरुवातीला म्हणजे मध्यमवयात असणाऱ्या स्रियांनी हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी नियमितपणे आपले ब्लडप्रेशर म्हणजेच रक्तदाब तपासणे महत्त्वाचे आहे असे एका अभ्यासातून समोर आले आहे.(Middle-aged women check blood pressure regularly to avoid risk of heart attack)  या वयात जर स्रियांनी त्यांच्या ब्लडप्रेशरकडे लक्ष दिले नाही तर वयाच्या ५०व्या वर्षी किरोनरी सिंड्रोमचा होण्याचा त्रास दुपट्टीने वाढू शकतो असे या अभ्यासात सांगण्यात आले आहे. वर्ल्ड हायपरटेन्शन डेच्या दिवशी युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डियोलॉजीमध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे.

मध्यमवयीन स्रियांना जर कधी अस्वस्थ वाटत असेल तर त्यांनी प्राथमिक काळजी म्हणून ब्लडप्रेशर तपासणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन काही नियमित अंतराने ब्लडप्रेशरची पातळी तपासणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे लठ्ठपणा, डायबिटीज, अनुवंशिक आजार, क्रिटिकल प्रेग्नंसी आणि हाय ब्लडप्रेशर असणाऱ्या लोकांना ह्रदयरोग म्हणजेच हार्ट अटॅकचा अधिक धोका असतो. स्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हाय ब्लडप्रेशरचा धोक अधिक असतो. मात्र हाय ब्लडप्रेशरचे निदान करण्याची सुरुवात दोघांमध्ये समान असते.

- Advertisement -

४१ वर्ष वयाच्या ६ हजार ३८१ महिला आणि ५ हजार ९४८ पुरुषांचे ब्लडप्रेशर तपासण्यात आले. १६ वर्ष केलेल्या फॉलो अप नंतर त्यांना ह्रदयविकाराचा धोका असल्याचे नोंदवण्यात आले. संशोधकांना या अभ्यासात असे आढळले आहे की, सौम्य रक्तदाब हा तीव्र किरोनरी सिंड्रोमशी संबंधित आहे. या संबंध पुरुषांमध्ये आढळला नाही. डॉ. क्रिंजलँड यांनी असे म्हटले आहे की, सौम्य रक्तदाब विशिष्ट पद्धतीने किरोनरी सिंड्रोमवर परिणाम करतो. त्यामुळे हाय ब्लडप्रेशर असणाऱ्या स्रियांच्या ह्रदयावर परिणाम होतो.

प्रत्येक स्रिला तिचे ब्लड प्रेशर किती आहे हे माहिती असणे गरजेचे आहे. ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे, स्वास्थ आहार घेणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर धूम्रपान,दारु पिणे,मीठाचे जास्त सेवन करणे टाळले पाहिले असे डॉ. क्रिंगलँड यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Post covid-19 diet : सावधान ! कोरोनामुक्तीनंतर भुक वाढलेय ? कारण वाचा

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -