घरदेश-विदेशस्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत कामकाजाच्या वेळा बदलल्या; बँकेत आता होणार लिमिटेड...

स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत कामकाजाच्या वेळा बदलल्या; बँकेत आता होणार लिमिटेड काम!

Subscribe

देशभरात कोरोनाचा कहर सुरू असून कोरोनाची दुसरी लाट पाहता देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या बँक शाखांच्या कामकाजाच्या वेळेत बदल केला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता होणारी गर्दी रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणे हा त्या मागचा हेतू आहे.

SBI आता आपल्या बँक शाखेत कामकाजाच्या वेळेत बदल करून सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत केले आहे. या वेळेनुसार बँका आता केवळ ४ तासांसाठीच उघडण्यात येणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीत ग्राहकांना बँकेने त्यांचे बहुतेक बँकिंग काम हे ऑनलाईन करण्याचा आणि अत्यावश्यक काम असेल तरच शाखेत जाण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल, कोविड -१९ ची सद्यस्थिती लक्षात घेता बँक SLBC (राज्यस्तरीय बँकर्स समिती) च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

बँकेत आता होणार ठराविक कामं

यासह एसबीआय बँकेने त्यांच्या शाखांमधील काम मर्यादित केले आहे. त्यामुळे आता बँकेत ठराविक कामं केली जाणार आहेत. ट्विटरवर देण्यात आलेल्या माहितीनुसार आता ही चार कामे एसबीआयच्या शाखेत करण्यात येणार आहेत

- Advertisement -

1. पैसे डिपॉझिट करणे किंवा पैसे काढणे
२. चेक क्लिअरिंग
३. ड्राफ्ट, आरटीजीएस आणि एनईएफटीशी संबंधित काम
४. शासकीय चलान संबंधित काम

यासह, बँकेने ट्विटरवर एक व्हिडिओ जारी केला आहे. यात त्यांनी बँक शाखेत कार्यरत ग्राहक तसेच ग्राहकांशी कसे वागावे याची माहिती दिली आहे. मास्कशिवाय कोणालाही बँक शाखांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. या व्यतिरिक्त बँक वेळोवेळी शाखांच्या स्वच्छतेसह इतर गोष्टींची काळजी घेईल.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -