घरठाणेती खासगी रुग्णालये ऑगस्टपर्यंत सुरू

ती खासगी रुग्णालये ऑगस्टपर्यंत सुरू

Subscribe

 ठामपाचा दिलासा

मुंब्य्रातील प्राईन क्रिटीकेअर रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर शहरातील ठामपाच्या अग्निशन विभागाने शहरातील ३४७ रुग्णालयांना अग्निसुरक्षा सक्षम करण्याबाबत पुन्हा नोटीस बजावल्या आहेत. त्यातच, आता राज्य शासनाने कोवीडच्या पार्श्वभूमीवर फायर एनओसी नसली तरी ३१ ऑगस्टपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी असे स्पष्ट केले आहे. त्याच धर्तीवर आता ठामपाने देखील बी फॉर्मच्या आधारावर या रुग्णालयांना तुर्तास ऑगस्ट २०२१ पर्यंत दिलासा दिला आहे.
बुधवारी पार पडलेल्या ठामपाच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास देसाई यांनी या संदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. शहरातील खाजगी रुग्णालयाच्या परवानगी बाबत काय निर्णय घेण्यात आला आहे, फायर एनओसीसाठी काही तारीख वाढवून देण्यात आलेली आहे का ? असा सवाल उपस्थित केला. दरम्यान ठाणे  शहरामध्ये सरकारी तसेच पालिका रुग्णालये व आरोग्य केंद्रांची संख्या ३४ च्या आसपास आहे तर एकूण ४३७ रुग्णालये शहरात आहेत. मुंब्य्रातील रुग्णालय दुर्घटनेनंतर शहरातील सर्व रुग्णालयांना पुन्हा नोटीसा बजावत अग्निसुरक्षा सक्षम करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यामध्ये २८२ रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा सक्षम असल्याचे समोर आले होते.

३४ खासगी रुग्णालये बंद असल्याचे तर, ६५ रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणाच नसल्याची बाबही पुढे आली होती. या ६५ रु ग्णालयांना नोटीसा बजावून अग्निशमन सुरक्षा यंत्रणा बसविण्याचे आदेश अग्निशमन दलाने दिले होते. मात्र त्याकडे या रु ग्णालयांनी अद्यापही दुर्लक्ष केल्याचे समोर आले होते. परंतु आता कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता अशा रुग्णालयांना आता राज्य शासनानेच ३१ ऑगस्टपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिलेली आहे. त्याचाच आधार घेत ठामपाच्या आरोग्य विभागाने देखील शहरातील अशा रुग्णालयांना फायर एनओसी नसली तरी देखील बी फॉर्मच्या आधारावर ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत परवानगी देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -