घरताज्या घडामोडीसोमवारपासून किराणा दूकाने सुरू ; बाजारपेठा बंदच

सोमवारपासून किराणा दूकाने सुरू ; बाजारपेठा बंदच

Subscribe

नाशिकमधील निर्बंध कायम राहणार; जिल्हाधिकार्‍यांचे स्पष्टीकरण

जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन रविवार (दि.२३) रात्री बारा वाजेपर्यंत आहे. १२ मे पासून सुरु असलेले कडक लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात येणार असले तरी, याचा अर्थ निर्बंध पूर्णपणे उठवण्यात आले असे नव्हे तर २१ एप्रिल रोजी राज्याने घोषित केलेल्या लॉकडाऊनचे जे नियम आहेत ते जसेच्या तसे लागू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. यात किराणा दुकाने उघडले जातील. पण बाजारपेठा बंद राहतील.

नाशिकमधील वाढती कोरोना रूग्णसंख्या विचारात घेता १२ ते २३ मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता किराणा, हॉटेल व्यावसायिकांना ठराविक वेळेत होम डिलिव्हरीची परवानगी देण्यात आली होती. निर्बंधांचा चांगला परिणाम दिसून आला असून रूग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्हयात लागू करण्यात आलेले निर्बंध सोमवारपासून शिथिल करण्यात येणार आहे. परंतु लॉकडाऊन उठणार असे मेसेजेस सोशल मिडीयाव्दारे व्हायरल होऊ लागल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, स्थानिक स्तरावर कठोर केलेले निर्बंध दिनांक 23 मे रात्री बारा वाजल्यापासून शिथिल करत आहोत. परंतु याचा अर्थ लॉकडाऊन पूर्ण उठला आहे असे नाही. त्यामुळे नाशिक शहर व जिल्ह्यातून पूर्ण लॉक डाऊन उठला आहे अशा गैरसमजात कोणी राहू नये. सर्वांनी पूर्वीच्या सर्व निर्बंधांचे यथोचित पालन करावे. मोठ्या प्रयत्नांनी रुग्णसंख्या कमी केली आहे. परंतु, आता पुन्हा निर्बंधांचे उल्लंघन केल्यास ती वाढायला वेळ लागणार नाही याची जाणीव ठेवून सर्वांनी निर्बंधांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

- Advertisement -

 

उद्योगांना द्यावी लागणार हमी
निर्बंधातील अटी शर्थींमुळे जिल्हयातील ७५ टक्के उद्योग बंद होते मात्र २४ मे पासून उद्योग, कारखाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र प्रत्येक कामगार व त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी घेत असल्याचे हमीपत्र उद्योगांना द्यावे लागणार आहे. तसेच कारखान्याच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागणार आहे.

- Advertisement -

 

बाजार समित्या होणार सुरू

 लॉकडाऊन काळात बाजार समित्या पूर्णत: बंद ठेवण्यात आल्या होत्या. पंरतु अनेक शेतकर्‍यांचा माल पडून खराब होत असल्याने ’ब्रेक द चेन’ च्या अनुषंगाने असलेल्या अटी शर्तीच्या आधीन राहून 23 मे नंतर बाजार समित्या देखील सुरु करण्यात येणार आहे. तसेच बाजार समिती प्रमुखांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही, असे हमीपत्र घेण्यात यावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

 

असे असतील निर्बंध

किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ सुरू ठेवता येतील

नागरिकांना दुकानांमध्ये जाउन खरेदी करता येईल.

अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठा बंदच राहणार

हॉटेल रेस्टॉरंटमधून सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहतील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -