घरCORONA UPDATEपालिकेच्या ग्लोबल टेंडरमधून लस पुरवठादाराची माघार, ७ कंपन्यांची कागदपत्रेच नाहीत

पालिकेच्या ग्लोबल टेंडरमधून लस पुरवठादाराची माघार, ७ कंपन्यांची कागदपत्रेच नाहीत

Subscribe

७ कंपन्यांपैकी ५ कंपन्यांशी पालिकेची चर्चा 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसली असून लसीकरण मोहिमेचा वेग वाढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु लसींच्या तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ग्लोबल टेंडर काढले आहे. या टेंडरच्या माध्यमातून पालिका विविध कंपन्यांकडून लसीचा साठा घेणार आहे. मात्र पालिकेच्या या ग्लोबल टेंडरमधून एका पुरवठादाराने माघार घेतली आहे. कोणतेही कारण न देता फायझरच्या अस्ट्रॅझेनेका कंपनीने मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून माघार घेतली आहे. विशेष म्हणजे कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणारी मुंबई ही देशातील पहिली महापालिका ठरली होती. दरम्यान पालिका ७ पुरवठादारांकडून चर्चा करत आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी मुंबईकरांना ऑगस्ट अखेरपर्यंत लस टोचण्याचे उद्दीष्ट असल्याचे पालिकेने सांगितले आहे.

७ कंपन्यांपैकी ५ कंपन्यांशी पालिकेची चर्चा 

महापालिकेच्या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद देणाऱ्या ७ कंपन्यांपैकी ५ कंपन्यांशी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून चर्चा केली आहे. मात्र अद्याप या कंपन्यांनी कोणत्याही आवश्‍यक कागदपत्र सादर केलेली नाहीत. हे सर्व पुरवठादार कंपन्या आहेत. त्यामुळे पालिकेच्या लसीकरणाच्या मोहिमेत मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे कंपनीकडून पालिकेच्या गरजेनुसार, त्यांना लस पुरवठा होईल याबाबचे पत्र लस उत्पादकांना सादर करण्याच्या सुचना पालिकेने केल्या आहेत. जेणेकरुन हे पुरवठादार कंपनीकडून आवश्‍यक लसींचा पुरवठा करु शकतील, अशी खात्री मिळेल.

- Advertisement -

येत्या १ जूनपर्यंत मुदत वाढ

मात्र ही खात्री झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरु होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. मात्र या कंपन्यांकडून अद्याप आवश्यक कागदपत्रे सादर न झाल्याने त्यांना येत्या १ जूनपर्यंत मुदत वाढ दिली आहे. लस उत्पादक कंपन्यांना लसीच्या वितरणासाठी ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ आणि ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -