घरदेश-विदेशIAF AFCAT 2021: भारतीय वायुसेनेत नोकरीची संधी, असा करा अर्ज

IAF AFCAT 2021: भारतीय वायुसेनेत नोकरीची संधी, असा करा अर्ज

Subscribe

असा करा ऑनलाईन अर्ज 

IAF Recruitment 2021 (AFCAT)- भारतीय वायुसेनेत भर्ती होऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण भारतीय वायुसेनेतर्फे घेण्यात येणाऱ्या हवाई दलाच्या कॉमन अ‍ॅडमिशन टेस्टची घोषण करण्यात आली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला भारतीय वायुसेनेत भर्ती होऊन देशसेवा करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. एकूण ३३४ रिक्त जागांसाठी ही संयुक्त प्रवेश परीक्षा २०२१ ला घेण्यात येणार आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया १ जून २०२१ पासून सुरू होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२१ पर्यंत आहे.

या व्यतिरिक्त एअर फोर्स एनसीसीच्या विशेष प्रवेश आणि सामग्री विभागाअंतर्गतही भरती प्रक्रिया राबवली आहे. यासाठी हवाई दलाने (IAF jobs) अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ही भरती प्रक्रिया एअरफोर्सच्या विविध शाखांमध्ये फ्लाइंग आणि ग्राउंड लेवलसाठी केली जाणार आहे.

- Advertisement -

कोणत्या शाखेत किती जागा?

एफसीएटी प्रवेश (AFCAT Entry)
फ्लाइंग ड्यूटी – ९६ पदे
ग्राउंड ड्यूटी (टेक्निकल) – १३७ पदे
ग्राऊंड ड्यूटी नॉन टेक्निकल – ७३ पदे
मेट्रोलॉजी ब्रांच – २८ पदे

एनसीसी स्पेशल एन्ट्री (IAF NCC Entry)- सीडीएसईच्या रिक्त जागांच्या १० टक्के जागा आणि एफसीएटी एसएससीच्या १० टक्के जागा रिक्त असणार आहेत.

- Advertisement -

शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट

फ्लाईंग ब्रांच- या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचे वय १ जुलै २०२२ पर्यंत २० ते २४ दरम्यान असले पाहिजे. उमेदवाराकडे बारावीनंतर कोणत्याही विषयात भौतिकशास्त्र आणि गणितासह पदवी असणे गरजेचे आहे. किंवा बीई, बीटेक कोर्स असणं गरजेचे आहे.

ग्राउंड ड्यूटी (टेक्निकल- नॉन टेक्निकल ) – या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १ जुलै २०२१ पर्यंत २० ते २४ दरम्यान असणे गरजेचे आहे. टेक्निकल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास बारावीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित विषयात किमान ६०% गुण असणे आवश्यक आहे. याशिवाय अभियांत्रिकी / तंत्रज्ञानातील ४ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम किंवा इंटीग्रेट पीजी पदवी असणे आवश्यक आहे. तर नॉन-टेक्निकल पदासाठी कोणत्याही विषयात किमान ६०% गुणांसह पदवी असणे आवश्यक आहे.

एनसीसी स्पेशल एन्ट्री – एनसीसी एअर विंगचे वरिष्ठ विभाग ‘सी’ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त उड्डाण करणाऱ्या शाखेची पात्रता पूर्ण असणे आवश्यक आहे.

मटेरियोलॉजी एन्ट्री – विज्ञान / गणित / सांख्यिकी / भूगोल / संगणक अनुप्रयोग / पर्यावरण विज्ञान / उपयोजित भौतिकशास्त्र / समुद्रशास्त्र / भौतिकशास्त्र / कृषी साहित्यशास्त्र / पर्यावरणशास्त्र / पर्यावरणशास्त्र / भौगोलिक विज्ञान / पर्यावरण जीवशास्त्र) कोणत्याही विभागात पीजी डिग्री असणे आवश्यक आहे.

डीजीसीए (भारत) ने जारी केलेला वैध आणि सध्याचा व्यावसायिक पायलट परवाना असलेल्या उमेदवारासाठी उच्च वयोमर्यादीत वयात २६ वर्षांपर्यंतची सवलत दिली आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज 

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारास इंडियन एअरफोर्स करिअर वेबसाईट careerindianairforce.cdac.in वर किंवा सीडीएसी (CDAC) वेबसाइट afcat.cdac.in या वेबसाईटचा वापर करु शकतात. या एफसीएटी अर्जासाठी २५० रुपये शुल्क भरावा लागणार आहे. मात्र एनसीसी आणि मटेरियोलॉजी प्रवेशासाठी कोणतेही अर्ज शुल्क घेतले जाणार नाही.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -