घरमहाराष्ट्रनाशिककळवण तालुक्यात केळी उत्पादनाचा यशस्वी प्रयोग

कळवण तालुक्यात केळी उत्पादनाचा यशस्वी प्रयोग

Subscribe

आठ एकरात अडीचशे टन उत्पादन,सूक्ष्म नियोजनाने बहरली केळीची शेती

पारंपरिक शेतीला फाटा देत शेतीत नवनवीन प्रयोग केले तर नाविण्यतेसह इतर शेतकर्‍यांनाही प्रेरणा मिळू शकते, हे उदाहरण कळवण तालुक्यातील मानूर येथे बघायला मिळत आहे. येथील डॉ. समीर पवार यांनी केळी उत्पादनाचा प्रयोग यशस्वी करत शेती क्षेत्रातील तरुण शेतकर्‍यांपुढे प्रेरणा निर्माण केली आहे.

नामांकित स्त्री रोगतज्ज्ञ, रोटरीचे माजी प्रांतपाल आणि विविध सामाजिक-शैक्षणिक उपक्रमांचे आधारवड स्वर्गीय डॉ. अमृतराव तथा आप्पासाहेब कृष्णाजी पवार यांचे सुपुत्र असलेल्या डॉ. समीर पवार यांनी शेती क्षेत्रात आधुनिकतेची कास धरत सूक्ष्म नियोजन, घेत असलेल्या पिकाबद्दल पूर्ण अद्ययावत माहिती आणि कष्ट करायची जिद्द ठेवली तर शेतीत नाविन्यता निर्माण करता येते ही खूणगाठ मनाशी बांधून भगिणी श्रीलेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाने मानूर येथील आपल्या शेतात केळी उत्पादन करण्याचे ठरवले. आठ एकर क्षेत्रात जैन एरिगेशनच्या जी -९ प्रकारातील रोपांची लागवड त्यांनी केली. एक एकर क्षेत्रात जवळपास दहा हजार रोपे लागवड करण्यात आली असून एकूण आठ एकर क्षेत्रातून अडीचशे टनच्या आसपास उत्पादन निघेल, अशी माहिती डॉ. पवार यांनी दिली. रोपे, खते, हार्वेस्टर व इतर बाबी धरून एकरी ९६ हजार रुपये खर्च असून एकरी ४५ ते ५० टन उत्पादन निघणार आहे. सध्या पॅकेजिंग आणि एक्सपोर्टचे काम सुरू आहे.
एकंदरीतच, डॉ. पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील पारंपरिक शेतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने अभ्यासपूर्ण केळीची लागवड करून कळवण तालुक्यात केळी उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला आहे.

- Advertisement -

शेती क्षेत्रातली वेगळी वाट

डॉ. समीर पवार हे नाशिक शहरातील नामांकित डॉक्टर असून स्वर्गीय डॉ. आप्पासाहेब पवारांचा सामाजिक वारसा आणि बहीण श्रीलेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाने शेती क्षेत्रातही वेगळे प्रयोग राबवत असून आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. जळगाव जिल्ह्यात केळीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्ह्यात अपवादात्मक उदाहरण आढळतात. मानूर येथील डॉ. पवार यांनी केळी लागवड केलेले हे क्षेत्र नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे क्षेत्र आहे.

शेतकर्‍यांनी पारंपरिक पिकांसोबतच शेतीत नाविन्यता जोपासून नवनवे प्रयोग राबवायला हवेत. सद्यस्थितीत युवा शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करत असून वेगवेगळे प्रयोग राबवत आहेत, ही आशादायक बाब आहे. आम्हीदेखील केळी उत्पादनाचा हा प्रयोग पहिल्यांदाच करत असून तो यशस्वी झाला आहे.
– डॉ. समीर पवार, मानूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -