घरCORONA UPDATEVaccination: मुंबईत ६० दिवसात लसीकरण करण्याचा प्रयत्न - आदित्य ठाकरे

Vaccination: मुंबईत ६० दिवसात लसीकरण करण्याचा प्रयत्न – आदित्य ठाकरे

Subscribe

मुंबईत लसी अभावी सध्या लसीकरण प्रक्रिया धीम्या गतीने सुरू

लसीचा आवश्यक साठा हातात आल्यास संपूर्ण मुंबईकरांचे लसीकरण करू शकतो. मुंबईत ६० दिवसांत लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. मुंबईत लसी अभावी सध्या लसीकरण प्रक्रिया धीम्या गतीने सुरू आहे. १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींच्या लसीकरणाबाबत कसं नियोजन करायचे याबाबत आज आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर व पालिका आयुक्त इकबाल चहल आणि संबंधित अधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक पालिका मुख्यालयात पार पडली. (Vaccination: Attempt to vaccinate in 60 days in Mumbai – Aditya Thackeray)

या बैठकीत काय चर्चा झाली, काय नियोजन करण्यात आले याबाबत मंत्री आदित्य ठाकरे यांनी, थोडक्यात माहिती दिली.
कोरोनाची विदारक स्थिती कशी हाताळली, त्यासाठी कसे नियोजन केले व कोरोनावर कसे नियंत्रण मिळविले याबाबत सुप्रीम कोर्टापासून पीएमनी मुंबई मॉडेलचे कौतुक केले आहे. जे सत्य आहे ते समोर आणत आहोत व नागरिक त्याला प्रतिसाद देत आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

भाजपला टोला

आमदार मंगलप्रभात लोढा यांनी, दुकानदारांना लॉकडाऊनमधील शिथिलतेमध्ये परवानगी द्यावी अन्यथा दुकानदार टोकाचा निर्णय घेतील, असा इशारा सरकारला दिला होता. त्याचा नामोल्लेख टाळत, आदित्य ठाकरे यांनी, ‘कुणाला मज्जा वाटतेय म्हणून निर्बंध वाढवत किंवा काढत नाही. ही लाट गंभीर आहे. तिस-या लाटेची तयारी करीत आहोत.आम्ही कोणतेही आकडे लपवलेले नाहीत. लोकांची जबाबदारी सरकारवर आहे, असे सांगत आदित्य ठाकरे भाजपला टोला लगावला.


हेही वाचा – अत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी २ पर्यंत खुली राहणार, मुंबई महापालिकेचा निर्णय

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -