घरक्रीडाWTC Final : कोहलीसह टीम इंडियाचे खेळाडू जिममध्ये गाळताहेत घाम; पहा व्हिडिओ

WTC Final : कोहलीसह टीम इंडियाचे खेळाडू जिममध्ये गाळताहेत घाम; पहा व्हिडिओ

Subscribe

कोहली हा जगातील सर्वात फिट क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. तोसुद्धा बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत जिममध्ये मेहनत घेताना दिसला.

भारतीय संघ लवकरच इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. मात्र, त्याआधी भारताचे क्रिकेटपटू मुंबईमध्ये क्वारंटाईन असून जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. भारतीय संघासाठी हा इंग्लंड दौरा खूप महत्वाचा असणार आहे. या दौऱ्याची सुरुवात पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात होणार आहे. साऊथहॅम्पटन येथे १८ ते २२ जून या कालावधीत होणाऱ्या या अंतिम सामन्यात टीम इंडियासमोर न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. हा सामना आणि संपूर्ण इंग्लंड दौऱ्यासाठी शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे फिट असण्याचा भारतीय खेळाडूंचा प्रयत्न आहे. त्यामुळे कर्णधार विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रविंद्र जाडेजा, चेतेश्वर पुजारा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांसारखे आघाडीचे खेळाडू जिममध्ये मेहनत घेताना दिसले.

- Advertisement -

बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचा व्हिडिओ शेअर केला. ‘टीम इंडियाची जोरदार तयारी सुरु आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी जिममध्ये घाम गाळला,’ असे बीसीसीआयने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले. कोहली हा जगातील सर्वात फिट क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. तोसुद्धा बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत जिममध्ये मेहनत घेताना दिसला.

३ जूनला होणार इंग्लंडमध्ये दाखल

भारतीय संघ मागील काही दिवसांपासून मुंबईत क्वारंटाईन असून ३ जूनला चार्टर्ड विमानाने इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. त्यांना कोरोना आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह सोबत ठेवणे बंधनकारक असणार आहे. तसेच इंग्लंडमध्ये दाखल झाल्यावर त्यांना थेट साऊथहॅम्पटनच्या हॅम्पशायर बोल मैदानात असलेल्या हॉटेलमध्ये नेण्यात येणार आहे. तिथे भारतीय खेळाडू व्यवस्थापित अलगीकरणात राहतील.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -