घरताज्या घडामोडीCoronavirus in China: चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर; ग्वांगझोउमध्ये केलं लॉकडाऊन

Coronavirus in China: चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर; ग्वांगझोउमध्ये केलं लॉकडाऊन

Subscribe

जगभरात जीवघेणा कोरोना व्हायरस पसरण्याचे कारण म्हणजे चीन, असा दावा अनेक वैज्ञानिकांनी केला आहे. या महामारीच्या सुरुवातीला कोरोना व्हायरसने चीनमध्ये अक्षरशः हैदोस घातला होता. पण कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला यश आले. सध्या जागतिक कोरोनाच्या यादीत चीन ९८व्या स्थानी आहे, जो चीन एकेकाळी पहिल्या स्थानावर होता. परंतु आता पुन्हा एकदा कोरोनाने चीनमध्ये पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या दक्षिण मॅन्युफॅक्चरिंग केंद्र ग्वांगझोउमध्ये (Guangzhou) मंगळवारी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. माहितीनुसार येथे ११ नवे कोरोनाबाधित आढळल्यानंतर पुन्हा एका भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्वांगझोउची लोकसंख्या १५ लाख आहे. अलीकडच्या काळात या शहरात ३० हजारांहून अधिक स्थानिक लोकांना कोरोनाचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चीनमधला हे शहर कोरोना व्हायरसचा हॉट स्पॉट झाला आहे. येथे मास्क अनिवार्य केला असून चाचण्या वेगाने केल्या जात आहेत. कोरोना रोखण्यासाठी आता कडक लॉकडाऊन देखील येथे लावण्यात आला आहे. शहर पूर्णपणे बॅरिकेडिंग केले आहे. तसेच या शहरात ये-जा करणाऱ्या लोकांवर बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisement -

ग्वांगझोउच्या महानगरपालिकेने सोमवारी घोषणा केली की, जोपर्यंत प्रत्येक घराची चाचणी करण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत लोकांनी काटेकोरपणे नियमांचे पालन करावे. शहरात ७ लाखांहून अधिक लोकांची कोरोना चाचणी झाली आहे. दरम्यान १४४ कोटी लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये प्रत्येक दिवसाला १०-१२ कोरोनाबाधित आढळत आहेत. ग्वांगझोउमध्ये ३० आणि ३१ मे दरम्यान २७ नवे कोरोनाबाधित आढळले. यामधील ७ जण दुसऱ्या देशातून आलेले होते उर्वरित २० स्थानिक होते. त्यामुळे यानंतर शहरात कडक निर्बंध लादले आहेत.


हेही वाचा – Corona Vaccine: भारताने लस निर्यातीवर बंदी घातल्यामुळे ९१ देशांना झटका – WHO

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -