घरमुंबईमुदतपूर्व निवडणूक ते ३० वॉर्ड फोडण्याचं कारस्थान; आशिष शेलारांचे सेनेवर ४ गंभीर...

मुदतपूर्व निवडणूक ते ३० वॉर्ड फोडण्याचं कारस्थान; आशिष शेलारांचे सेनेवर ४ गंभीर आरोप

Subscribe

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिका निवडणुकीवरुन शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून शिवसेनेची काही खलबतं आणि कटकारस्थान सुरू असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला. आशिष शेलार यांनी चार गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात कारस्थान करण्यासाठी शिवसेनेने चार प्रयत्न केले. मात्र, शिवसेनेचे हे चारही प्रयत्न फसल्याचा दावा शेलार यांनी केला. शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या निवडणुका मुदतपूर्व घेण्याचं कारस्थान रचलं. यात अपयश आल्यानंतर महापालिकेची प्रभागरचना ही भाजपला पूरक असल्याचा आरोप करत ती बदलण्याचाही प्रयत्न झाला. मात्र हा प्रयत्न फसल्याचा दावा केला. तिसरा प्रयत्न म्हणजे निवडणुका दोन वर्ष पुढे ढकलण्याचा डाव आहे. तर चौथा प्रयत्न म्हणजे ३० वॅार्ड जे आजन्म शिवसेना आणि काँग्रेसला जिंकताच येणार नाहीत अशा ठिकाणी फोडाफोडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा दावा आशिष शेलार यांनी केला.

- Advertisement -

निवडणुका पुढे ढकलण्याचं कारस्थान

आशिष शेलार यांनी सेनेवर गंभीर आरोप केले आहेत. कोरोनाच्या नावाखाली अनेक गोष्टी सुरू आहेत. २०११ च्या जनगणेनुसार २०१७ ची प्रभागरचना झाली, मग आता त्याच जनगणनेनुसार २०२२ मध्ये प्रभागरचना का? जनगणना करता येणार नाही, नव्याने मतदार नोंदणी करताना जास्त वेळ लागेल, असा त्यामागचा डाव आहे. होता येईल तेवढं निवडणूक पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे, असा आरोप आशिष शेलार यांनी केला.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -