घरमुंबईदंडूकाधारी नव्हे, माणूस म्हणून जगवणारा पोलीस

दंडूकाधारी नव्हे, माणूस म्हणून जगवणारा पोलीस

Subscribe

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टरांप्रमाणेच पोलिसांचे योगदान मोलाचे आहे. लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी आपल्या दंडूकांनी बर्‍याच जणांना वठणीवर आणल्याच्या क्लिप मोबाईलवर आपण पाहिल्या आहेत. याला अपवादही असंख्य आहेत. कोणी कोरोनात एकाकी पडलेल्या मुलांचं सांगोपांग करतो तर कोणी एकटी पडलेल्या माऊलीची देखभाल करतो. पण पनवेल व अलिबाग न्यायालयात सध्या कार्यरत असलेले तसेच अलिबाग पोलीस मुख्यालयात पैरवी कर्मचारी म्हणून काम करीत असलेले सचिन भास्कर खैरनार यांनी मानवतेचे दर्शन घडविले आहे.

अलिबाग ते पनवेल दरम्यान रस्त्यावर फिरणारे फिरस्ते यांना कोरोनाच्या बाबतीत कसलेही ज्ञान नाही, ते त्यांच्या दुनियेत जगत असतात. मग सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या आरोग्याचे आणि एकूणच जीवनाचे काय? ते कित्येक दिवस आंघोळ करत नाहीत? अशा फिरस्त्यांसाठी देवदूत म्हणून धावून आले ते पोलीस सचिन खैरनार. घाणेरडे, समाजापासून दूर गेलेले, माणूस म्हणून तिरस्काराची वागणूक भेटलेल्या फिरस्त्यांना पोलीस सचिन खैरनार यांनी मायेने चौकशी करत त्यांची अंघोळ घालत स्वतःच्या पैशातून खरेदी केलेले मास्क त्यांनी या फिरस्त्यांच्या तोंडाला लावले.

- Advertisement -

एकीकडे कोरोनाशी चार हात करणारे पोलीस तर दुसरीकडे कोरोना होऊ नये म्हणून कायद्याचा धाक दाखवणारे दंडुकाधारी पोलीस केवळ ड्युटी करणारा पोलीस नव्हे तर समाजाचा देणेकरी म्हणून माणुसकी जपणाराही पोलिसच असतो, हेच आपल्या कृतीतून पोलीस सचिन खैरनार यांनी दाखवून दिले आहे. हे वेडे, भिकारी, फिरस्ते जरी असले तरी तीही माणसेच आहेत. त्यांनाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. दंडुकेधारी ओळख असलेला पोलीसही माणसातला माणूस म्हणून दुसर्‍याला जगवतो याची जाणीव आज सचिन खैरनार यांनी त्यांच्या कृतीतून पाहायला मिळते. पोलीस खात्याबरोबरच जिल्ह्यातील सामाजिक संघटनांकडून खैरनार यांचे कौतुक केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -