घरदेश-विदेशउत्तम पर्यावरणासाठी जैव इंधनाला प्रोत्साहन; जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान करणार संबोधित  

उत्तम पर्यावरणासाठी जैव इंधनाला प्रोत्साहन; जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान करणार संबोधित  

Subscribe

जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाला सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे.

जागतिक पर्यावरण दिन म्हणजेच ५ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्वांना संबोधित करणार आहेत. जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाला सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, तसेच पर्यावरण, वने आणि हवामानाबद्दल मंत्रालयातर्फे संयुक्तरित्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘उत्तम पर्यावरणासाठी जैव इंधनाला प्रोत्साहन’ ही या वर्षीची मुख्य कल्पना आहे. या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते ‘वर्ष २०२० ते २०२५ मध्ये भारतात इथेनॉल मिश्रण आखणी संदर्भात तज्ज्ञ समितीच्या अहवालाचे अनावरण होईल.

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भारत सरकार E-20 नोटिफिकेशनद्वारे इंधन कंपन्यांना १ एप्रिल २०२३ पासून २० टक्के इथेनॉल मिसळलेले पेट्रोल विक्रीचे, तसेच बीआयएसच्या निर्देशांना अनुसरून अधिक इथेनॉल मिश्रणासाठी E12 आणि E15 निर्देश जारी करणार आहे. यामुळे इथेनॉल गाळण्यासाठी अधिक डिस्टीलेशन सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न होतील आणि देशभरात इथेनॉलमिश्रित इंधन उपलब्ध होईल. यामुळे २०२५ पर्यंत इथेनॉल निर्माण करणाऱ्या राज्यांमध्ये, तसेच त्यांच्या जवळपासच्या विभागांमध्ये इथेनॉलचा खप वाढण्यास मदत होईल.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी पुण्यात तीन ठिकाणी उभारलेल्या E100 वाटप स्थानकांच्या प्रायोगिक प्रकल्पांचे उद्घाटन करतील. इथेनॉल मिश्रित पेट्रोल आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प यांचे निर्माते शेतकरी यांचे अनुभव जाणून घेण्याचा पंतप्रधान प्रयत्न करणार आहे. त्यासाठी ते शेतकऱ्यांशी चर्चा करतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -