घरताज्या घडामोडीपवई तलाव परिसरातील सायकल, जॉगिंग टॅकच्या कामाची आदित्य ठाकरेंनी केली पाहणी

पवई तलाव परिसरातील सायकल, जॉगिंग टॅकच्या कामाची आदित्य ठाकरेंनी केली पाहणी

Subscribe

निसर्गाशी साधर्म्य साधणारी रंगसंगती ठेवून तसेच निसर्गाची हानी न करता हिरवाई जपून अधिकाधिक नागरिकांना आकर्षित करता येईल असे पर्यटनस्थळ विकसित करावे

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पवई तलाव परिसरात बांधण्यात येणाऱ्या सायकल आणि जॉगिंग ट्रॅक बरोबरच सौंदर्यीकरणाच्या कामाची पर्यटन मंत्री तथा उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी पाहणी केली. पवाई तलाव परिसरातील संवर्धन व सुशोभिकरण कामाच्या प्रगतीचा आढावा आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे. या परिसरात ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेत सुमारे १० किमीच्या सायकल ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅकची पाहणी केली आहे. निसर्गाचे सौंदर्य जपून नवीन वर्षापर्यंत काम पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

पवई हा मुंबईतील हिरवाईने नटलेला महत्त्वाचा परिसर आहे. येथील तलाव परिसरात बांधण्यात येणाऱ्या सायकल आणि जॉगिंग ट्रॅक बरोबरच सौंदर्यीकरणाच्या कामाची पर्यटन मंत्री तथा उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी पाहणी केली. निसर्ग सौंदर्य जपून आंतरराष्ट्रीय दर्जाची कामे करावीत, असे निर्देश आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलारासू, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

पवई तलाव परिसराचे जतन आणि सौंदर्यीकरण करताना येथे सुमारे १० कि.मी.चा सायकल आणि जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात येत आहे. येथे लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांच्या सोयीच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध कराव्यात. अंतर जास्त असल्याने विविध ठिकाणी प्रवेश आणि बाहेर पडण्याची सोय असावी. निसर्गाशी साधर्म्य साधणारी रंगसंगती ठेवून तसेच निसर्गाची हानी न करता हिरवाई जपून अधिकाधिक नागरिकांना आकर्षित करता येईल असे पर्यटनस्थळ विकसित करावे, अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

- Advertisement -

डिलाईन रोड ओव्हरब्रिजच्या कामाचा आढावा

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी डिलाईल रोड ओव्हरब्रिजच्या कामाला सरप्राइज भेट दिली. रेल्वेच्या सहकार्याने हे काम काटेकोरपणे वेळेत पूर्ण करून वाहतुकीची कोंडी लवकरात लवकर कमी करण्याचा प्रयत्न आहे. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, सहाय्यक आयुक्त, शरद उघडे, शाखाप्रमुख गोपाल खडये व महापालिका अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -