घरट्रेंडिंगGold Rate: ऐन दिवाळीत सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता, जाणून घ्या...

Gold Rate: ऐन दिवाळीत सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता, जाणून घ्या सध्याचे दर

Subscribe

भारतात सध्या २२ कॅरेट सोन्यासाठी ४७ हजार १२० रुपये

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून सोन्याच्या दरात कमालीची वाढ झाल्याचे पहायाला मिळत आहे. सोन्याच्या किंमती ५० हजारांपर्यंत पोहचल्याचे देखील पहायला मिळाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका भारताना बसला. त्याचप्रमाणे जागतिक बाजारपेठांनाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये सातत्याने चढ उतार पहायला मिळत आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या किंमतींनी उच्चांक गाठला होता. येत्या काळात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वर्षाअखेरिस ऐन दिवळीच्या काळात सोन्याच्या किंमती ५५ हजारांपर्यंत पोहचण्याची शक्यता IIFLसिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी वर्तवली आहे. त्यामुळे लाँग टर्म गुंतवणूकीसाठी सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला देखील देण्यात येत आहे. (Gold Rate: Gold prices likely to rise on Diwali festival, current gold rate in india)

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सोन्याच्या किंमती वाढल्या. त्यानंतर अनलॉक नंतर पुन्हा सोन्याच्या दरात घट झाली होती. मात्र पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे पहायला मिळाले. ३१ मे रोजी मागील १० महिन्यातील सर्वात उच्चांकी दर नोंदवण्यात आला होता. सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १९०७.५९ डॉलर प्रति औंस पर्यंत पोहचली होती. भारतात १० ग्रॅम सोन्यासाठी ५३ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात असा अंदाज BoFAने वर्तवला आहे.

- Advertisement -

भारतात सध्या २२ कॅरेट सोन्यासाठी ४७ हजार १२० रुपये मोजावे लागत आहेत. तर २४ कॅरेट सोन्याच्या १ ग्रॅम प्रति तोळ्यासाठी ५१ हजार २७० रुपये मोजावे लागत आहेत. एप्रिल महिन्यात भारतातील बाजारपेठांमध्ये सोन्याच्या किंमतीत ३ हजार रुपयांनी वाढ झाली. पुढील काळात सोन्याच्या किंमती आणखी वाढू शकतात. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही वेळ अगदी योग्य असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.


हेही वाचा – ‘या’ फळाला म्हणतात फळांची महाराणी! नाव आहे ‘नूरजहाँ’; किंमत ऐकून व्हाल थक्क!

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -