घरताज्या घडामोडीमुंबईकरांना मिळणार हरित ऊर्जेचा पर्याय

मुंबईकरांना मिळणार हरित ऊर्जेचा पर्याय

Subscribe

मुंबईतील वीज ग्राहकांसाठी हरित ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने पुढाकार घेतला आहे. मुंबईतील पश्चिम व पूर्व मुंबई उपनगरातील अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (एईएमएल) या सर्वात मोठ्या वीज वितरण कंपनीने ‘मुंबई-ग्रीन दर पुढाकार’ सादर केला आहे. एमईआरसीच्या मंजूरीनुसार, कॉर्पोरेट्स, औद्योगिक, व्यावसायिक, हॉटेल्स व रेस्तरां तसेच निवासी अशा सर्व ग्राहकांना हरित उर्जेचा पर्याय स्वीकारता येणार आहे. हा पर्याय तात्काळ येणाऱ्या देयक चक्रासह स्वीकारता येणार असून ग्राहकांना त्याद्वारे हरित ऊर्जा प्रमाणपत्र दरमहा मिळेल. ‘हरित ऊर्जा दर’ या संकल्पनेवरच त्यांना हिरव्या रंगाचे वीजबिलही मिळेल.

अदानी इलेक्ट्रिसटीच्या ग्राहकांसाठीच्या हरित दर पुढाकाराच्या पर्यायाबाबत एईएमएलचे प्रवक्ते म्हणाले की, ‘अदानी इलेक्ट्रिसिटी हरित ऊर्जा दर पुढाकार कॉर्पोरेट्स व अन्य ग्राहकांना जबाबदार नागरिक होण्याची संधी देत आहे. याद्वारे आपण सर्व मिळून जग, भारत व मुंबईला हरित करण्यासाठी, अधिक शाश्वत करण्यासाठी योगदान देऊ.’ शाश्वत लक्ष्य मिळविण्याच्यादृष्टीने ग्राहकांचे महत्त्वाचे योगदान, हे एक संकल्पक पाऊल असेल. शाश्वत भविष्यासाठी या संकल्पक पुढाकारात सहभागी होण्याचे एईएमएलचे आवाहन आहे. आरई१०० च्या सर्व सदस्यांचे एईएमएलकडून स्वागत आहे. जागतिक पातळीवरील सर्वाधिक प्रभावात्मक व्यवसायाचा १०० टक्के नुतनीय उर्जेचा हा जागतिक उपक्रम आहे.

- Advertisement -

अदानी इलेक्ट्रिसिटी हरित दर पुढाकारात एईएमएल ग्राहकांना अर्ज करण्याची प्रक्रिया :

a) १९१२२ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करता येईल. त्याखेरीज [email protected] यावर ई-मेल करता येईल. तसेच आमच्या http://adanielectricity.com या संकेतस्थळाला भेट देऊन अदानी इलेक्ट्रिसिटी हरित दर पुढाकाराबाबत अधिक माहिती घेता येईल.
b) हरित दर पुढाकार स्वीकारणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट ६६ पैसे अतिरिक्त द्यावे लागतील.
c) एकूण ऊर्जा वापराच्या किती टक्के हरित ऊर्जा असावी, हे निवडण्याचे स्वातंत्र्य एईएमएलच्या ग्राहकांना असेल.
d) एईएमएल अशा ग्राहकांना मासिक प्रमाणापत्र देईल. त्यावर नमूद असेल की, तुम्ही हरित ऊर्जा स्वीकारली आहे व त्या देयकाचा रंग हा हिरवा असेल.
e) हा एईएमएलच्या सध्याच्या व अपेक्षित ग्राहकांसाठी ऐच्छिक कार्यक्रम असेल. या ग्राहकांना हरित ऊर्जा दर तसेच सामान्य दर निवडीचा पर्याय पुढील देयक चक्रापासून असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -