घरताज्या घडामोडीपुण्यात निर्बंध शिथिल, मॉलसह दुकानं ७ वाजेपर्यंत राहणार सुरु, अजित पवार यांची...

पुण्यात निर्बंध शिथिल, मॉलसह दुकानं ७ वाजेपर्यंत राहणार सुरु, अजित पवार यांची घोषणा

Subscribe

पुण्यात सोमवारपासून शिथिलतेचे नियम लागू करण्यात येणार

राज्यात पाच टप्प्यात कोरोनारोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. पुण्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट आता ५ टक्क्यांवर आला आहे. यामुळे पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे. पुण्यातील दुकाने, मॉल्स आता संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुणेकरांना थोडा दिलासा मिळालाय परंतु कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपर्यंत राहिला तरच निर्बंध शिथिल राहणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीला पुण्याचे विभागीय आयुक्त सौरव राव आणि इतर अधिकारी, जिल्हाधिकारी,पोलीस अधिकारी उपस्थित होते. पुण्यातील कोरोना पॉझिटिव्हिटि रेट ५ टक्क्यांच्या खाली आल्यामुळे जिल्ह्यातील निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याबाबत निर्णय घेतला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता

पुण्यात सोमवारपासून शिथिलतेचे नियम लागू करण्यात येणार आहेत. यामध्ये सर्व नियमांचे पालन करुन मॉल्स सुरु करण्यात येतील. सध्या ४ वाजेपर्यंत सुरु असलेल्या दुकानांना आथा ७ वाजेपर्यंत परवानगी असेल. रेस्तरॉ आणि हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सोमवारपासून सर्व खुले करण्याची परवानगी दिली असली तरी पॉझिटिव्ह रेटकडे कटाक्षाने बघितले जाणार आहे. जर कोरोना पॉझिटिव्हिटी रेच ५ टक्क्यांच्या आतमध्ये असेल तर परवानगी असेल अन्यथा परवानगी नाकारली जाऊ शकते यामुळे पुणेकरांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

पुण्यातील हॉटेल ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील,अभ्यासिका आणि ग्रंथालयांना देखील ५० टक्के उपस्थितीत सुरु असतील, तसेच मॉलबाबत सोमवारी नियमावली जारी करण्यात येणार आहे. सिनेमागृह,नाट्यगृह बंद राहतील असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -