Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई मुंबईतील चांदिवलीदरम्यान असलेल्या मारवा रोड पुलाचा भाग कोसळला

मुंबईतील चांदिवलीदरम्यान असलेल्या मारवा रोड पुलाचा भाग कोसळला

Related Story

- Advertisement -

मुंबईत पावसाला सुरुवात होत नाहीच तोवर पडझडीच्या घटनांना सुरुवात झाला आहे. यात आज मरोळ आणि चांदिवलीदरम्यान असलेल्या मारवा रोड पुलाचा काही भाग कोसळ्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे मारवा रोड पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली असून वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आज सकाळच्या सुमारही दुर्घटना घडली आहे.

साकीनाका जंक्शनला जोडणारा हा मुख्य पुल

या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन, पालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहचले आहे. मारवा रोड पुलाखालून जाणार रस्ता हा साकीनाका जंक्शनवरून पुढे अशोक नगर, सिद्धार्थ नगरला जाण्यासाठीचा महत्त्वाचा रस्ता आहे. साकीनाका जंक्शन, अशोक नगरला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्यामुळे पुलावरून आणि खालून मोठ्याप्रमाणात वाहतुक होत असते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे या पुलाचा खालचा काही भाग कोसळला आहे. या पुलाखाली पाणी पुरवठा करणारी मोठी जलवाहिनी आहे. सध्य़ा हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून पुलाचा उर्वरित भाग केव्हाही कोसळू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

मारवा रोड या धोकादायक पुलासंदर्भात स्थानिक नगरसेवक लोक प्रतिनिधींकडून पालिकेला तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार पुढील काही दिवसांत या पुलाचे काम हाती घेण्यात येणार होते. मात्र दुरुस्ती पूर्वीच या पुलाचा मोठा भाग आज कोसळला आहे. सध्या पुलावरील वाहतूक पालिका आणि वाहतूक पोलिसांमार्फत घाटकोपर अंधेरी मार्गे वळवण्यात आली आहे. तसेच पुलाचा मलबा उपसण्याची काम सुरु आहे.


corona vaccine booking:पेटीएम, इंफोसिससह १५ कंपन्या देणार ऑनलाईन वॅक्सिन बुकिंगची सुविधा


 

- Advertisement -