घरमहाराष्ट्रफडणवीसांचे विश्वासू, रोहित पवारांचे विरोधक राम शिंदे आणि अजितदादा यांच्यात गुप्त भेट;...

फडणवीसांचे विश्वासू, रोहित पवारांचे विरोधक राम शिंदे आणि अजितदादा यांच्यात गुप्त भेट; चर्चांना उधाण

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे कट्टर विरोधक भाजपचे नेते माजी मंत्री राम शिंदे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली. कर्जत तालुक्यातील अंबालिका कारखान्यावर राम शिंदे आणि अजित पवार यांच्यात गुप्त भेट झाली. या दोघांमध्ये अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. मात्र काय चर्चा झाली याचा तपशील बाहेर आलेला नाही.

अंबालिका कारखाना आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात येतो. राम शिंदे हे रोहित पवार यांचे कट्टर विरोधक असून त्यांना पराभूत करत रोहित पवार आमदार झाले. त्यामुळे रोहित पवार यांचे कट्टर विरोधक आणि देवेंद्र फडणवीस यांची विश्वासू राम शिंदे यांची अजित पवार यांनी भेट घेतल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार नेहमी कारखान्यावर येत असतात. त्यांचा हा दौरा गोपनीय असतो. अजित पवार शनिवारी सकाळी या कारखान्यात उपस्थित असताना राम शिंदे कारखान्यात पोहोचले. या दोन नेत्यांमध्ये अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. राज्यात सध्या राजकीय भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यात आता अजित पवार आणि राम शिंदे यांच्यात बंद दाराआड भेट झाल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

- Advertisement -

राजकीय भेटींना उधाण

राज्यात सध्या राजकीय भेटी वाढल्या आहेत. सुरुवात देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या भेटीने झाली. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथी घरी भेट दिली. या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ खडसे सिल्व्हर ओकवर पोहोचले. या भेटींचा चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली. या भेटीनंतर बरेच तर्कवितर्क लावण्यात आले. ही चर्चा थांबता न थांबता निवडणूक रणनीतकार प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली. त्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात काहीतरी शिजतंय हे नाकारता येणार नाही.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -