घरताज्या घडामोडीछगन भुजबळ यांचे आंदोलन म्हणजे OBCच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण, दरेकरांचा आरोप

छगन भुजबळ यांचे आंदोलन म्हणजे OBCच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण, दरेकरांचा आरोप

Subscribe

भुजबळ यांना समाजाविषयी कदर असेल तर त्यांनी सरकारला आव्हान द्यावे

मराठा आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरल्यानंतर आता ओबीसी समाजही आरक्षणासाठी आंदोलन करणार आहे. गुरुवारी ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे. राज्य सरकारमध्ये मंत्री असताना छगन भुजबळ यांचे ओबीसी आरक्षणासाठी आंदोनल काढणं म्हणजे ओबीसींच्या खांद्यावर बंदुक ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडवला नाही तर भुजबळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार का? असा सवाल दरेकरांनी उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधल्याच मंत्र्याची संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात उतरते. याचा अर्थ राज्य सरकारवर विश्वास नाही. किंवा सरकारकडून काम करुन घ्यायचे नाही. आपला तो मुद्दा आहे म्हणून राजकारण करायचं असा स्पष्ट याचा अर्थ होतो. छगन भुजबळ या राज्याचे महत्त्वाचे नेते असून सरकारमधले महत्त्वाचे नेते आहेत. ओबीसीच्या संदर्भात राज्य सरकारने जे करायला पाहिजे ते कॅबिनेट आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन समाजाला ते देऊ शकतात परंतु दुर्दैवाने ते होताना दिसत नाहीत. ओबीसीच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलं राजकारण साधता येतंय का? अशा प्रकारचा प्रयत्न यामागे दिसत आहे. भुजबळ यांना समाजाविषयी कदर असेल तर त्यांनी सरकारला आव्हान द्यावे. असे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीरी आरक्षणाचा प्रश्न सोडवावा यासाठी वेळ सरकारला द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडावला नाही तर माझ्या पदाचा राजीनामा देतो असं धाडस भुजबळ दाखवणार का? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला आहे. हे सगळे प्रश्न निरर्थक आहेत जो प्रश्न सरकारशी संबंधित आहे. ज्या सरकारचा भुजबळ एक भाग आहेत. भुजबळ यांनी मंत्रिमंडळात बसून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे.

- Advertisement -

परंतु यामध्ये सरकारसोबत चर्चा होत नाही. कॅबिनेटशी चर्चा होत नाही आहे ज्या त्या गोष्टी सरकारशी बोलल्या जात आहेत. सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे कोणत्याही गोष्टीचा ताळमेळ दिसत नाही आहे. ओबीसीमध्ये नेतृत्वाची स्पर्धा लागली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना वाटत आहे की, ओबीसीचा नेते होईल राष्ट्रवादीचे छगन भुजबळ ओबीसीचे नेते आहेत. पहिल्यापासून कामही करत आणि आता इतर नेतेही ओबीसी समाजासाठी काम करु पाहत असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -