घरमहाराष्ट्रनाशिकराज ठाकरेंचा वाढदिवस विनापरवानगी साजरा, आयोजकांवर गुन्हे

राज ठाकरेंचा वाढदिवस विनापरवानगी साजरा, आयोजकांवर गुन्हे

Subscribe

पोलीस आयुक्तांकडून दिलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विनापरवानगी कार्यक्रम राबवला गेला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी आयोजकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तांकडून दिल्या गेलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन केल्यामुळे मनसेचे देवचंद केदारे (रा. महाकाली चौक, नवीन नाशिक) व अर्जुन वेताळ, ललित वाघ, नितीन माळी, संदेश जगताप व इतर १० ते १५ लोकांनी मिळून साईबाबा मंदीर, महाकाली चौक, नवीन नाशिक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित केले. दुसर्‍या घटनेत ललीत वाघ (रा. राजरत्ननगर, नवीन नाशिक) व अर्जुन वेताळ, नितीन माळी, संदेश जगताप व इतर १० ते १५ जणांनी मिळून पवननगर स्टेडियम येथे वृक्ष वाटप व मराठी स्वाक्षरी स्पर्धा घेतली. त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल

शिवसेनेचे कार्यकर्ते सुयश पाटील (रा. नवीन नाशिक) व नीलेश सांळुखे, निखिल मेदळे, एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य १० ते १५ जणांनी पेलिकन पार्कमागे सुयश पाटील यांचा वाढदिवस व शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. आयोजकांनी लोकांना विनापरवानगी एकत्र जमवून मनाई आदेश व प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन ओदशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -