घरमहाराष्ट्र'देशमुख, परब तर प्यादी, खरे सुत्रधार सिल्व्हर ओक, वर्षावर' - अतुल भातखळकर

‘देशमुख, परब तर प्यादी, खरे सुत्रधार सिल्व्हर ओक, वर्षावर’ – अतुल भातखळकर

Subscribe

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घरांवर ईडीने छापे टाकले. यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देताना गंभीर आरोप केले आहेत. अतुल भातखळकर यांनी थेट इशारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख आणि अनिल परब हे केवळ प्यादे असून खरे सुत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसल्याचं म्हटलं आहे. “आज ईडीची कारवाई ज्यांच्यावर झाली ते अनिल देशमुख आणि त्याच प्रकारचे आरोप असलेले अनिल परब ही प्यादी आहेत खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत,” असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

- Advertisement -

अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली असून नागपूरसह वरळीच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. ईडीकडून एकीकडे अनिल देशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी छापा टाकण्यात आलेला असताना दुसऱ्या टीमने वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला. तसंच गृहमंत्री असताना ज्या शासकीय निवासस्थानी राहत होते त्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर देखील झापा टाकला असून झाडाझडती सुरु आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -