घरमुंबईसिडकोला घेराव घालणाऱ्या आजी-माजी आमदार, खासदार मंत्र्यांसह २० हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल

सिडकोला घेराव घालणाऱ्या आजी-माजी आमदार, खासदार मंत्र्यांसह २० हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल

Subscribe

लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलेच पाहिजे, या मागणीसाठी बेलापूर येथे सिडकोवर घेराव आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर एन आर आय पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विद्यमान आमदार, माजी खासदार, माजी मंत्री तसेच नवी मुंबई व पनवेल येथील आजी-माजी महापौर, उपमहापौर यांच्यासह सुमारे १८ ते २० हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती एन आर आय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली.

लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याच्या मागणीसाठी सीबीडी येथे २४ जून रोजी करण्यात आलेल्या आंदोलनात नवी मुंबई, पनवेल, उरणसह संपूर्ण ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यासह इतर ठिकाणाहून आंदोलकांची मोठी गर्दी जमली. या आंदोलनात  विविध राजकीय पक्ष, विविध संस्था, संघटना, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त नागरिक आंदोलनकर्त्यांनी सहभागी घेऊन ‘जय दिबा’ असा एल्गार केला.

- Advertisement -

कोणत्या कलमांर्तगत गुन्हे दाखल?

‘फक्त दिबा दुसरे नाव दिले तर १९८४ च्या पेक्षा मोठा क्रांती लढा होईल, असा खणखणीत आवाजही दिला. मात्र, कोविडचे संकट असताना एव्हढी मोठी गर्दी जमा केल्याने आयोजकांसह सुमारे १८ ते २० हजार आंदोलकांवर गुंज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये आयोजकांसह ४ माजी खासदार, २ माजी मंत्री, ७ आमदार, २ माजी आमदार, नवी मुंबई , पनवेल येथील महापौर व उपमहापौर यांचा समावेश आहे. त्यांच्यावर साठी रोग कायदा, सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण, जमाव बंदी , महाराष्ट्र पोलीस पोलीस अधिनियम १९५१, ध्वनी प्रदूषण, वन विभाग कायदा, कोविड २०२० कमल ११ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


CBI चौकशीची मागणीने संजय राऊतांच्या छातीत धडकी का भरली?, चित्रा वाघ यांचा सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -