घरमहाराष्ट्र'हवाईयन' बेटासारखी 3 दिवस रंगणार होती इगतपुरीत रेव्ह पार्टी !

‘हवाईयन’ बेटासारखी 3 दिवस रंगणार होती इगतपुरीत रेव्ह पार्टी !

Subscribe

थीममध्ये हवाईयन म्हणजेच हवाई बेटांवरील संस्कृतीवर आधारीत थीम या पार्टीत मांडण्यात आली होती.रंगीबेरंगी फुलांची डिझाइन, आखूड कपडे या थीममध्ये अशा प्रकारची भर करण्यात येते.

इगतपुरीत सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर रविवारी (दि.२७)मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात सिनेसृष्टीतील कलाकारांना अटक केल्याने पुन्हा सिनेसृष्टी वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. पोलिसांनी बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या हिना पांचाल हिच्यासह एक विदेशी महिला, मराठी आणि दक्षिणात्य चित्रपट क्षेत्रात काम करणार्‍या पाच अभिनेत्री, २ कोरियोग्राफर महिलांसह २२ जणांना बिभत्स अवस्थेत ताब्यात घेतले. पोलिसांनी कॅमेरा, ट्रायपॉड, कोकेन ड्रग्ज, हुक्कासह आंमली पदार्थ व रोकड जप्त केली.

पियुष शहाच्या वाढदिवासाची पार्टी देण्यासाठी शुक्रवारी (दि.२५) सकाळी विभा दिनेशभाई गोंडलिया या अरव, रुचिरा नार्वेकर आणि आकीब खान यांच्यासमवेत इगतपुरीतील स्काय ताज व्हीलामध्ये थांबले. या ठिकाणी शुक्रवारी रात्री १२ वाजता पियुषचा वाढदिवसाचा केक कापण्यात आला. दुसर्‍या दिवशी शनिवारी रात्री ८ वजेनंतर रेव्ह पार्टीला सुरुवात झाली.

- Advertisement -

पार्टीमध्ये ड्रग्ज,कोकेन,गांजा,चरस सारख्या आंमली पदार्थाचे सेवन केले जात असल्याचे पोलिसांना आढळले होते इतकेच नाही तर हवाई बेटांप्रमाणे ‘हवाईन थीम’ वर रंगलेल्या या रेव्ह पार्टीचे मुख्य आकर्षण अभिनेत्री हीना पांचाल हिच्यावर आधारीत होती. या थीममध्ये हवाईयन म्हणजेच हवाई बेटांवरील संस्कृतीवर आधारीत थीम या पार्टीत मांडण्यात आली होती.रंगीबेरंगी फुलांची डिझाइन, आखूड कपडे या थीममध्ये अशा प्रकारची भर करुन रंगवण्यात येणार असल्याचे उघडकीस आले आहे.


हे हि वाचा – जम्मू कश्मीर: सुरक्षा दलाच्या चकमकीत लष्करचा टॉप कमांडर अबरारसह दोन दहशतवादी ठार

- Advertisement -

 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -