घरदेश-विदेशजम्मू कश्मीर: सुरक्षा दलाच्या चकमकीत लष्करचा टॉप कमांडर अबरारसह दोन दहशतवादी ठार

जम्मू कश्मीर: सुरक्षा दलाच्या चकमकीत लष्करचा टॉप कमांडर अबरारसह दोन दहशतवादी ठार

Subscribe

हा दहशतवादी हल्ला ज्यावेळी घडला होता तेव्ही सुरक्षा दलाला काही काळापूर्वी मोठे यश मिळाले होते. काही तासांपूर्वी सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाचा कमांडर नदीम अबरार याला अटक केली

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील परिमपोरा भागात सुरक्षा दलांच्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. सुरक्षा दलातील चकमकीत दोन अधिकारी आणि एक जवान जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अजूनही आणखी काही अतिरेकी या भागात लपून बसल्याचा संशय सुरक्षा दलाला वाटत आहे. त्यांना शोधण्यासाठी अद्याप तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत्युमुखी झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानी दहशतवादी होता तर दुसरा दहशतवादी संगठन अबरार लष्करचा टॉप कमांडर होता तसेच त्यांच्या जवळ दारुगोळाचा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितानुसार श्रीनगर मधील परिमपोरा विभागाच्या मलहूरा मध्ये सुरक्षादलांच्या जवानामध्ये आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती तसेच सुरक्षारक्षकांचे जवान पेट्रोलिंगसाठी गस्त घालण्यास गेले असता त्यावेळीस दहशतवाद्यांनी त्यांच्यावर फायरिंग करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे. श्रीनगर बारामुल्ला सीमेवर अनेक हत्या आणि दहशतवादी कारवायांमध्ये अबरारचा सहभाग असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हायवेवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांबद्दल सैन्य दलाला माहिती मिळाली. तेव्हा सतर्कता दाखवत हायवेवर पोलीस आणि सीआरपीएमने संयुक्त तपासणी केली गेली.

कश्मीर पोलिस जोन यांनी ट्वीट करत लिहले आहे की, “श्रीनगरमधील मल्हूरा परिमपोरा भागात हल्ला सुरु झाला. पोलिस आणि सुरक्षारक्षक  तैनात करण्यात आले आहेत.” एनकाउंटरच्या कारणास्तव स्थानीक विभागातील परिसर पुर्णपणे रिकामा करण्यात आला आहे.
हा दहशतवादी हल्ला ज्यावेळी घडला होता त्याआधी नुकतच काही काळापूर्वी सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले होते. काही तासांपूर्वी सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाचा कमांडर नदीम अबरार याला अटक केली. त्याच्यासह एका दहशतवाद्याला अटकही करण्यात आली आहे. नदीम अबरार 2018 पासून लष्करात काम करत होते. IG काश्मीर विजय कुमार यांनी नदीम अबरारच्या अटकेमुळे मोठे यश मिळाले असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – परमबीर सिंह ६० दिवसांच्या रजेवर


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -