घरCORONA UPDATECorona Vaccine : Zydus Cadila ने लसीच्या तिसऱ्या ट्रायलसाठी DGCI कडे मागितली...

Corona Vaccine : Zydus Cadila ने लसीच्या तिसऱ्या ट्रायलसाठी DGCI कडे मागितली मंजुरी

Subscribe

देशात कोरोना विषाणूची दुसरी लाटेची गती मंदावत असली तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे देशात लसीकरण मोहिमेचा वेग वाढवला जात आहे. यातच गुरुवारी (आज) भारतातील अग्रगण्य औषध कंपनी असलेल्या Zydus Cadila कंपनीकडून त्याच्या ZyCoV-D या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळावी यासाठी DGCI कडे अर्ज केला आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने तात्काळ (DCGI) मंजुरी दिल्यास १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी ही लस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लसीला मान्यता मिळाल्यास ती जगातील पहिली DNA आधारित लस असणार आहे.

- Advertisement -

भारतात आतापर्यंत तीन लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळाली आहे. परंतु Zydus Cadila च्या ZyCoV-D लसीच्या वापराला परवानगी मिळाल्यास देशातील चौथी तर स्वदेशी प्रकारातील दुसरी लस भारतात उपलब्ध होणार आहे. सध्या या ZyCoV-D लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी Zydus Cadila ने २८००० स्वयंसेवकांचा वापर केला होता. त्याचा अहवाल आता ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) आता जमा करण्यात आला आहे. या चाचणी अहवालांच्या आधारे ZyCoV-D लसीला मंजुरी मिळाल्यास जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्टमध्ये १२ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना ही लस दिली जाईल.

Zydus Cadila कंपनीची ZyCoV-D ही लस डीएनए आधारित असल्याने त्यामध्ये एक जेनेटिक कोड आहे. त्या जेनेटिक कोडमुळे शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने या लसीला मंजुरी दिल्यास भारतात भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन लसीनंतर Zydus Cadila ची ZyCoV-D ही दुसरी स्वदेशी लस ठरणार आहे.

- Advertisement -

खासगी रुग्णालयांना आता थेट मिळणार नाही कोरोनाविरोधी लस, CoWin द्वारे करावी लागेल ऑर्डर


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -