घरठाणेगणेशोत्सवावरील निर्बंध शिथिल करा! अन्यथा ठाणे महापालिकेपुढे आंदोलन

गणेशोत्सवावरील निर्बंध शिथिल करा! अन्यथा ठाणे महापालिकेपुढे आंदोलन

Subscribe

गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारने नुकतीच एक नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये गणेश मूर्तीच्या उंचीबाबत आणि इतरही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यावरून ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे प्रशासन मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्यानेे येत्या काही दिवसांतच ठाणे महापालिका प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये सामना रंगताना दिसणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सवावरील निर्बंध शिथिल केले नाहीत तर येत्या मंगळवारी महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ठाण्यातील गणेशोत्सव समितीने दिला आहे. तसेच आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यात कोरोनाचे सावट आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंगळवारी गणेशोत्सव नियमावली जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या नियमावलीचा पुनर्विचार करावा. तसेच त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे. असे झाले नाही तर मुख्यमंत्र्यांपर्यंत भावना पोहोचवण्यासाठी येत्या मंगळवारी ठामपासमोर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा समितीने दिला आहे. ठाण्यात जवळपास २५० हून जास्त गणपती मंडळ आहेत.

- Advertisement -

गणेशोत्सव समितीच्या बैठकीत मूर्तीची उंची, देखावा, धार्मिक कार्यक्रम, आगमन व विसर्जन मिरवणूक यासारख्या मुद्यांबाबत सूचना मांडण्यात आल्या. राज्य सरकारने गणेशोत्सवावर घातलेल्या निर्बंधामुळे सर्व गणेशोत्सव पदाधिकार्‍यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या नियमांमध्ये शिथिलता द्यावी, अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष समीर सावंत यांनी केली आहे. सरकारने शिथिलता दिली नाही तर महापालिका मुख्यालयासमोर मंगळवारी तीव्र स्वरुपात आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -