घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोदींच्या फलकावर फेकली शाई

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोदींच्या फलकावर फेकली शाई

Subscribe

महागाईच्या निषेधार्थ आंदोलन, केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

जळगाव – देशभरात महागाईने नवा उच्चांक गाठला असून, सर्वसामान्यांचे जगणे अवघड बनले आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून, जळगाव शहरात महागाईविरोधात राष्ट्रवादीने केलेल्या आंदोलनाप्रसंगी कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावरील पंतप्रधान मोदींच्या होर्डिंगवर शाई फेकली. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

शहरातील मोहाडी रस्त्यावरील पेट्रोल पंपावर इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. मोदी हटाओ देश बचाओ, पंतप्रधान मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आंदोलकांनी पेट्रोल पंपावरील मोदींच्या प्रतिमेवर शाई फेकली. यावेळी पोलिसांनी धाव घेत कार्यकर्त्यांना ताब्यात घेत फलकावरील शाई पंपावरील कर्मचार्‍यांच्या मदतीने पुसून टाकली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. इंधनाचे दर शंभरी पार गेले आहेत. गॅसचे दरही साडेआठशे रूपयांजवळ पोहोचले आहेत. कोरोनामुुळे दीड वर्षे व्यवहार बंद असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, असे असताना आता महागाईने लोकांचे जगणेच मुश्किल केले आहे. भुलथापा देवून निवडून आलेल्या मोदी सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करतो, अशा शब्दांत त्यांनी निषेध व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -