घरमहाराष्ट्रपुण्यात कालव्याचा हाहाकार, शेकडो कुटुंबं रस्त्यावर

पुण्यात कालव्याचा हाहाकार, शेकडो कुटुंबं रस्त्यावर

Subscribe

पुण्यामध्ये खडकवासला धरणातून शहराला आणि जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या, मुठा नदीचा आज उजवा कालवा फुटला. त्यामुळे पुणे शहरातील अनेक भागात अक्षरश: पूरसदृष परिस्थीती ओढावली. पाण्याच्या प्रभावामुळे दांडेकर पूल परिसरात शंभर ते दीडशे झोपड्या आणि घरांचे नुकसान झाले आहे.

पुण्यामध्ये खडकवासला धरणातून शहराला आणि जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या, मुठा नदीचा आज उजवा कालवा फुटला. त्यामुळे पुणे शहरातील अनेक भागात अक्षरश: पूरसदृष परिस्थीती ओढावली. पाण्याच्या प्रभावामुळे दांडेकर पूल परिसरात शंभर ते दीडशे झोपड्या आणि घरांचे नुकसान झाले आहे. घरांमध्ये तसंच झोपड्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंबं बेघर झाली आहेत. या भागातील सर्वसामान्यांच्या मदतीला स्थानिक गणेश मंडळं तसंच स्थानिक नगरसेवक आणि समाजसेवक धावून आले आहेत. याशिवाय महापालिका प्रशासनही बाधित घरातील कुटुंबांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. मात्र, याप्रकरणी पाठबंधारे विभागाकडुन कुठलीही मदत देण्यात आली नाही. दांडेकर पुलाजवळ असणाऱ्या झोपडपट्टीत वेगाने पाणी घुसल्यामुळे अधिक नुकसान झाले आहे. तसंच वस्तीतील काही घरांच्या भिंती कोसळल्यामुळे जवळपास १०० ते १२० झोपड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दांडेकर पुलाजवळील अशा एकुण तीन वेगवेगळ्या ठिकाणच्या झोपडपट्ट्या पाण्याखाली गेल्या आहेत. मुठा कालव्यात १२०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले होते हा कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. याशिवाय हे पाणी वेगाने शहरात घुसल्यामुळे मोठीही वित्तहानी झाली आहे.

दरम्यान ज्या लोकांच्या घरांचे नुकसान झाले आहे त्या सर्वांच्या खाण्या-पिण्याची सोय, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि समाजसेवकांनी जवळच्या समाजमंदिरांमध्ये केली आहे. याशिवाय बाधित नागरिकांच्या सुरिक्षततेच्यादृष्टीने आवश्यक सर्व मदत याठिकाणी पुरवली जात आहे. मुठा कालव्यात १२०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले होते हा कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले असून घरे,रस्ते,ओढे,नाल्यांमध्ये पाणी घुसल्यानं मोठी वित्तहानी झाली आहे.जलसंपदा विभागाच्या बेफिकीरीमुळंच हा प्रकार घडला असून पुणेकरांकडून सोशल मिडियाद्वारे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. मुठा नदीच्या या कालव्याची दुरवस्था गेल्या अनेक दिवसपासुन झाली असताना स्थानिक नगरसेवकांनी पाठबंधारे विभागाकडे लेखी तक्रारीही केल्या होत्या मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने हि दुर्घटना घडली असल्याचे स्थानिक नगरसेवकांनी सांगितले.


वाचा : कालवा फुटीमुळे पुण्यात नदीचे स्वरुप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -