घरमहाराष्ट्रज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू; पंकजा मुंडेंचा भाजपला पहिल्यांदाच इशारा

ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू; पंकजा मुंडेंचा भाजपला पहिल्यांदाच इशारा

Subscribe

राजकारणात कोणतंही पद मिळविण्यासाठी आलेली नाही. एखादं पद मिळवणं हे आपलं ध्येय नाही. गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न पूर्ण करणं हे आपलं ध्येय आहे. मला जेव्हा वाटेल इथं राम नाही आणि जेव्हा अंगावर छत कोसळेल, तेव्हा बघू, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाजपला पहिल्यांदाच इशारा दिला आहे. खासदार प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या समर्थकांनी राजीनामे दिले. या नाराज कार्यकर्त्यांशी आज पंकजा मुंडे यांनी संवाद साधला.

मुंडे समर्थकांचं राजीनामा सत्र सुरु असताना पंकजा मुंडे काय भूमिका घेणार यावर चर्चा सुरु होत्या. अनेक तर्कवितर्क लावले जात होते. परंतु आज पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आपण आपलं घर का सोडायचं? असा सवाल केला. एखादं पद मिळवणं हे आपलं ध्येय नाही. गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न पूर्ण करणं हे आपलं ध्येय आहे. मला जेव्हा वाटेल इथं राम नाही आणि जेव्हा अंगावर छत कोसळेल, तेव्हा बघू, असा इशारा देतानाच आता आपलं घर सोडायचं नाही. हा माझा निर्णय आहे तो तुम्ही मान्य कराल ही अपेक्षा आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

- Advertisement -

“गोपीनाथ मुंडे यांनी ऊसाच्या फडातून आणून माणसं जोडली. कुणाला सभापती बनवलं तर कुणाला मार्केट समितीचा चेअरमन केलं. हे असंच जाऊ द्यायचं का सगळं?, असा सवाल करतानाच इथून पुढे असा प्रयोग करू नका. तुम्ही माझ्यासाठी महत्त्वाचे आहात. पद मिळवणं हे मुख्य ध्येय नाही. गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न पूर्ण करणं आहे. मला जेव्हा वाटेल इथं राम नाही. तेव्हा बघू, असं पंकजा म्हणाल्या.

धर्म युद्ध टाळण्याचा प्रयत्न

कौरव आणि पांडवांचं युद्ध थांबवण्याचा प्रयत्न पांडवांनी केला. मग मी कोण आहे? माझी इच्छा आहे की, हे धर्मयुद्ध टळावं, कारण माझे सैनिक आडवे पडताहेत. धारातिर्थी पडत आहेत. कोणताही माणूस वैयक्तिक हेतूने कोणताही निर्णय घेतो, तो लाभार्थी असतो. सगळ्या पक्षांच्या याद्या बघितल्या, तर एक व्यक्ती स्वतःचा विचार करून काहीही मिळवू शकतो. मला माझ्यासाठी नकोय, तुमच्यासाठी हवंय. मला काही मिळालं नाही या चिल्लर गोष्टींवर मी जात नाही. मीही पांडव आहे. आम्हीही योद्धे आहोत. मीही धर्म युद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहे. जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहे, असं पंकजा मुंडे म्हमाल्या.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -