घरताज्या घडामोडी'आपलं कोकण फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरतं नाही', कोकणाच्या मदतीसाठी भरत जाधवचे...

‘आपलं कोकण फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरतं नाही’, कोकणाच्या मदतीसाठी भरत जाधवचे आवाहन

Subscribe

आपल्या परीने शक्य तितकी कोकणला साथ द्या. आपल्या कोकणाला मदतीचा हात देऊया

गेल्या २-३ दिवसांपासून संपूर्ण राज्यभर पावसाचा हाहा:कार सुरु आहे. राज्यातील अनेक जिल्हे पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. सतत सुरु असलेल्या पावसामुळे नद्यांना पूर आलेत, अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्यात. रायगडमधील महाड येथील तळीये गावात दरड कोसळून ३८ जणांचा मृत्यू झालाय. राजापूर, चिपळूण कोल्हापूरला या पूराचा सर्वाधिक तडाखा बसलाय. अजून बचावकार्य सुरु आहे. या परिस्थिती कोकणाची झालेली दयनीय अवस्था पहावेनाशी झालीय. ‘आपलं कोकण केवळ वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापूरतं नाही’, असे म्हणत आपल्या कोकणाला मदत करण्यासाठी पुढे या, असे आवाहन अभिनेता भरत जाधव यांनी केले आहे. यासंदर्भातील एक पोस्ट शेअर करत भरत जाधव यांनी संपूर्ण राज्यातील लोकांना मदतीची हाक दिली आहे. ( Marathi Actor Bharat Jadhav appeal for help flood situation in Konkan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

- Advertisement -

‘आपलं कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरतं नाही. सध्याच्या पूर संकटात आपल्या परीने शक्य तितकी कोकणला साथ द्या. आपल्या कोकणाला मदतीचा हात देऊया’, असे भरत जाधव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. शिवाय कोकणाला मदत करण्यासाठी काही संपर्क क्रमांक देखील दिले आहेत. त्याचप्रमाणे मदतीचे स्वरुप कसे असेल याविषयी देखील त्यांनी सविस्तर माहिती दिलीय. जास्त दिवस टिकतील असे फरसाण, वेफर्स,बिस्टिक,खजून यासारखे सुके पदार्थ, किराणा किट, कुटुंबासाठी जीवनावश्यक वस्तू, महिला व पुरुषांना लागणारी सर्व प्रकारची अंतर वस्रे, अंथरुण पांघरुन म्हणून वापरता येणारी जाड कापडे अशा प्रकारची मदत करण्याचे आवाहन करण्यात आलेय. मुंबई,पुणे,ठाणे, औरंगाबाद,धुळे,सातारा,कराड अशा राज्यातील संपूर्ण भागातून मदतीसाठी संपर्क क्रमांक देण्यात आला आहे.

कोकणात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा कहर सुरुच आहे. महाड येथील तळीये गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत प्रशासनाच्या मदतीने बचावकार्य सुरूवात होतानाच याठिकाणी विविध यंत्रणांमार्फत रेस्क्यू ऑपरेशनला सुरूवात झाली आहे. दरम्यान, पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ही केवळ अतिवृष्टी नाही तर अनपेक्षित संकट आहे – मुख्यमंत्री

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -