घररायगडमोहोपाडा प्रिया स्कूलकडून कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या पालकांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ

मोहोपाडा प्रिया स्कूलकडून कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या पालकांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ

Subscribe

मनसेचे दिपक कांबळी यांच्या प्रयत्नांना यश

कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सुविधा वगळता अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले.याशिवाय शालेय शिक्षणही ऑनलाइन शिक्षण पद्धतीने सुरु झाले. मात्र असे असले तरी विद्यार्थांना शैक्षणिक फी भरणे अनिवार्य होते. परंतू कोरोना संसर्ग कधी, कुठे, कुणाला, कशाप्रकारे गाठून वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतिषी अथवा तज्ञही सांगू न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या आजाराने रायगड जिल्ह्यातील वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीतील जवळपास ६८ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. घरातील कुटूंबाचा कर्तां पुरुषच कोरोना आजारात मरण पावल्याने कुटूंबाची गुजराण कशी करायची,या विचारात कुटुंब सदस्य आहेत. शिवाय मुलांचे शिक्षण, शैक्षणिक फि कुठून भरायची या समस्या निर्माण झाल्या आहेत.याच विषयाला अनुसरुन नागरिकांनी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळी यांच्याकडे व्यथा मांडली. दिपक कांबळी यांनी याबाबत मोहोपाडा येथील प्रिया स्कूल कमिटीशी संवाद साधला असता त्यांच्या प्रयत्नांना यश आले.

ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोरोनामध्ये दुर्दैवाने मृत्यूमुखी पडले आहेत,अशा पालकांच्या मुलांची शैक्षणिक फी संपूर्णतः माफ करण्यात यावी,अशी मागणी मनसेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळी यांनी मोहोपाडा प्रिया स्कूल कमिटीकडे केली होती. या मागणीला अनुसरून कोरोनात मयत पालकांच्या मुलांची शैक्षणिक फि माफ करणार असल्याचे प्रिआचे अध्यक्ष सुनिल कदम यांनी सांगितले. मनसेच्यावतीने प्रिया असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल कदम यांचे आभार मानण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – Raigad landslide : दरड दुर्घटनेचे संकट कायम! रायगडमधील हिरकणी वाडीत दरड कोसळली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -