घरदेश-विदेशविराग मधुमालती आता करणार 40 फूटी जाड संगीतग्रंथाच्या निर्मितीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये...

विराग मधुमालती आता करणार 40 फूटी जाड संगीतग्रंथाच्या निर्मितीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Subscribe

अवयवदानाचे महत्व पटवून देणाऱ्या या कार्यक्रमाच्या जोरावर विराग मधुमालती आणखी एक नवा आविष्कार "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" मध्ये नोंद करण्यासाठी रचणार आहेत.

नेत्रहीन लोकांच्या त्रासाची झळ ज्यांना दृष्टी आहे त्यांना कधीच लागणार नाही पण त्याच दृष्टीहीन बांधवांच्या त्रासाची जाण ठेवत आणि नेत्रदानाचा पवित्र संदेश देत तब्बल १०० दिवस डोळ्याला पट्टी बांधत,१०० पेक्षा जास्त नेत्रदान जागरूकता मोहिमा राबवत अनेक वेगवेगळे विश्वविक्रम करत ज्यांनी तब्बल ५ वेळा “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये आपल्या अनोख्या विक्रमांची नोंद केली असे गायक “विराग मधुमालती” आता अवयवदानाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत ठळकपणे पोहचावा यासाठी चक्क पाण्याखाली राहून सुरमधुर गाण्यांची (underwater singing) माळ गुंफणार आहेत. हा अद्भुत असा सोहळा भारतात नव्हे तर जगभरात पहिल्यांदाच होत असून हा कार्यक्रम घडवून आणणे देखील तितकंच आव्हानात्मक ठरणार आहे. कोरोना निर्बंधाच्या या काळात हा कार्यक्रम आपल्याला प्रत्यक्षात बघता येणं जरी अवघड असलं तरी यावर आयोजकांनी तोडगा काढला आहे… हा कार्यक्रम पूर्णतः “ऑनलाईन” म्हणजेच “व्हर्चुअल इव्हेन्ट” होणार असून घरबसल्या संपूर्ण परिवारासमवेत आपल्याला या अद्भुत कार्यक्रमाचे साक्षीदार होणे शक्य होणार आहे.

सदर कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम तसेच कॉमेडी किंग सुनील पाल यांचा स्टेज परफॉर्मन्स देखील होणार आहे. संगीताच्या या अनोख्या कार्यक्रमात विराग यांच्या आरोग्याला धोका असून देखील त्यांनी फक्त अवयवदानाचे महत्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे या एकाच उद्देशाने ही जोखीम उचलली आहे. आपल्या छातीवर ६० किलो वजन चढवून पाण्याखाली जाणे, पाण्यात गाणे गाताना छातीवरील वजनासहित ताल व सुरानुसार श्वासाचा समतोल राखणे, पाण्यामध्ये मुक्त वावर असलेल्या माश्यांमुळे विचलित न होता सुमधुर गीतांचा परफॉर्मन्स देणे, १-२ मिनिटं नाही तर तब्बल एक तास सतत गाण्याचा आविष्कार अशा बऱ्याच जोखिमा घेत साकारण्यासाठी विराग सज्ज होत आहेत. हा सोहळा २० नोव्हेंबर २०२१ रोजी पार पडणार आहे.

- Advertisement -

अवयवदानाचे महत्व पटवून देणाऱ्या या कार्यक्रमाच्या जोरावर विराग मधुमालती आणखी एक नवा आविष्कार “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये नोंद करण्यासाठी रचणार आहेत. गेल्या काही वर्षांच्या अथक परिश्रम आणि संशोधनानंतर त्यांनी तब्बल १७ लाख संगीत अलंकारांची निर्मिती केली असून याचा २ लाख पानांचा आणि चक्क ४० फूट उंच जाडीचा संगीतग्रंथ “संगीत का महासागर” या नावाने निर्मित केला जाणार आहे.


हे हि वाचा – Vaccine: केरळमध्ये २५ वर्षीय तरुणाने पायावर घेतली लस, कारण वाचून बसेल धक्का

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -