घरताज्या घडामोडी'शेरशाह' मधील 'रातां लंबिया' गाणं रिलीज, समोर आली सिद्धार्थ कियाराची जबरदस्त केमिस्ट्री

‘शेरशाह’ मधील ‘रातां लंबिया’ गाणं रिलीज, समोर आली सिद्धार्थ कियाराची जबरदस्त केमिस्ट्री

Subscribe

सिनेमातील दोघांची केमिस्ट्री उत्तमरित्या जुळून आली आहे. रातां लंबिया या गाण्यातून दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पहायला मिळाली आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth malhotra)  आणि अभिनेत्री कियारा आडवणी (Kiara advani)  सध्या त्यांचा आगामी सिनेमा शेरशाह (shershah ) सिनेमाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगला पसंतीस उतरला. सिद्धार्थ आणि कियाराचे एक रोमॅटिक गाणे देखील आज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. शेरशहा सिनेमातील ‘रातां लंबिया’ (Raataan Lambiyan) हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणे सिद्धार्थ आणि कियारावर चित्रीत करण्यात आले असून सिद्धार्थ आणि कियाराची जबरदस्त केमिस्ट्री यातून दिसून आली आहे. शुक्रवारी दुपारी हे गाणे प्रेक्षकांसाठी लाँच करण्यात आले. गाणे लाँच होताच त्याला हजोरो व्ह्यूज आणि शेअर्स मिळाले आहेत. (Raataan Lambiyan shershah movie new song release Siddharth malhotra and Kiara advani tremendous chemistry was seen)

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

- Advertisement -

सिद्धार्थ मल्होत्रा शेरशाह या सिनेमात शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांनी भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री कियारा आडवाणी विक्रम बत्रा याच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमातील दोघांची केमिस्ट्री उत्तमरित्या जुळून आली आहे. रातां लंबिया या गाण्यातून दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पहायला मिळाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

- Advertisement -

शेरशहा हा सिनेमा १२ ऑगस्टला अमॅझोन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. प्रेक्षक अनेक दिवसांपासून या सिनेमाची वाट पाहत आहेत. संपूर्ण सिनेमा हा कारगिल युद्धावर आधारित असणार आहे. शुटींगसाठी सिद्धार्थला कारगिलला जाता आले याविषयी त्याने एका मुलाखतीत म्हटले होते. त्याने पुढे असे म्हटले की, कारगिलमध्ये शुटींगसाठी काही जणांना परवानगी मिळाली होती. त्यामुळे कारगिलमधील अनेक ठिकाणचे शुटींग १ कॅमेरा आणि १ कॅमेरामन सोबत करण्यात आले होते. शुटींग करताना सर्व खरं घडत असल्याचे वाटत होते, असे सिद्धार्थने म्हटले.


हेही वाचा – ऋतिक रोशनने स्वत:चा फोटो शेअर करत विचारला कियारा आडवाणीला प्रश्न, चाहते झाले हैराण

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -