घरताज्या घडामोडीऋतिक रोशनने स्वत:चा फोटो शेअर करत विचारला कियारा आडवाणीला प्रश्न, चाहते झाले...

ऋतिक रोशनने स्वत:चा फोटो शेअर करत विचारला कियारा आडवाणीला प्रश्न, चाहते झाले हैराण

Subscribe

. ऋतिकने स्वत:चा फोटो शेअर करत कियाराला वैयक्तिक प्रश्न केलाय जो चाहत्यांच्या पचनी पडलेला नाही.

बॉलिवूडचा हॅडसम सुपरस्टार ऋतिक रोशन (Hrithik Roshan)  आपल्या फिटनेस आणि डान्ससाठी प्रसिद्ध आहे. ऋतिक सोशल मीडियावरही प्रचंड अँक्टिव्ह असतो. ऋतिक अभिनेत्री दीपिका पादुकोन (Deepika padukon) सोबत ‘फायइटर’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे सध्या ऋतिकची सोशल मीडियावर चर्चा आहे. मात्र ऋतिक सध्या आणखी एका कारणासाठी चर्चेत आलाय तो म्हणजे त्याने फोस्ट केलेला फोटा आणि त्याखाली अभिनेत्री कियारा आडवाणीला (Kiara Advani ) हिला विचारलेला प्रश्न. ऋतिकने स्वत:चा फोटो शेअर करत कियाराला वैयक्तिक प्रश्न केलाय जो चाहत्यांच्या पचनी पडलेला नाही. (Hrithik Roshan shares a photo and asks Kiara Advani questions is it looks fine)

ऋतिकने त्याचा एक कूल फोटो शेअर करत ‘कियारा तुला वाटत काय वाटत हे चांगले वाटतय का?’, ऋतिकच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांना एकच प्रश्न सतावत आहे की ऋतिकने कियाराला असा प्रश्न का विचारला असेल. कारण या आधी ऋतिक आणि कियारा यांच्यात इतकी जवळीक कधीच पहायला मिळाली नव्हती.

- Advertisement -

नुकतेच मिंत्रा (Myntra) या ई कॉमर्स साइटसाठी कियारा आणि ऋतिकने एकत्र फोटोशूट केले आहे. ऋतिकचा हा फोटो मिंत्राच्या फोटोशूटमधील आहे. ऋतिकच्या या पोस्टनंतर कियारा आणि ऋतिक आगामी काळात एकत्र दिसणार असे अंदाज लावण्यात आले आहेत. असे झाले तर ऋतिक आणि कियारा पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसतील. कियाराने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख तयार केली आहे. त्यामुळे कियाराला सुपरस्टार ऋतिकसोबत पाहताना चाहत्यांना वेगळी मजा येणार आहे.

- Advertisement -

ऋतिक आणि कियारा यांचे बरेच  सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ऋतिक लवकरचं ‘क्रिश४’, ‘फाइटर’ या सिनेमात दिसणार आहे. त्याचप्रमाणे ‘विक्रम वेधा’ या साउथ सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये ऋतिक काम करताना दिसणार आहे. तर कियारा लवकरच ‘शेरशाह’, ‘जुगजुग जियो’ आणि ‘भूल भुलैया २’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हेही वाचा – श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे करणार छोट्या पडद्यावर कमबॅक

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -