घररायगडआपलं महानगरच्या रायगड आवृत्तीचे आज प्रकाशन

आपलं महानगरच्या रायगड आवृत्तीचे आज प्रकाशन

Subscribe

रायगड जिल्ह्यातील वाचक ज्याची प्रतीक्षा करीत होते त्या दैनिक ‘आपलं महानगर’च्या रायगड आवृत्तीचे प्रकाशन आज शनिवारी, ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पनवेल येथे होत असून, यानिमित्ताने जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर येतील.

मराठी वृत्तपत्रांच्या विश्वात दबदबा असलेल्या ‘आपलं महानगर’ या दैनिकाला तब्बल ३३ वर्षांची परंपरा असून, मुंबईनंतर नाशिक आणि ठाणे आवृत्ती पाठोपाठ रायगडची आवृत्ती सुरू होत आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले असून, शेतीप्रधान जिल्हा अशी रायगडची मुख्य ओळख आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांचे शहरीकरण होत असताना त्या अनुषंगाने विविध समस्याही डोके वर काढू लागल्या आहेत. याशिवाय नैसर्गिक आपत्तींचा सामनाही या जिल्ह्याला नेहमी करावा लागत आहे. अशावेळी ‘आपलं महानगर’सारखे दैनिक आपल्या समस्या दमदारपणे शासन दरबारी पोहचू शकेल, असा विश्वास वारंवार वाचकांनी व्यक्त केलेला आहे. हाच विश्वास कायम ठेवण्यासाठी ‘आपलं महानगर’चे दमदार पाऊल रायगडमध्ये पडत आहे. शहरातील एसटी बस स्थानकासमोर लाईफ लाईन हॉस्पिटलशेजारी साई आर्केडमध्ये ‘आपलं महानगर’च्या कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन आणि रायगड आवृत्तीचे प्रकाशन होत आहे.

- Advertisement -

यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, शेकापचे आमदार बाळाराम पाटील, शिवसेनेचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार मनोहर भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, इंटकचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते महेंद्र घरत, पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किशोर जैन, मनसेचे जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी आणि माहिती,जनसंपर्क विभागाचे कोकण उपसंचालक गणेश मुळे आणि जिल्हा माहीती अधिकारी मनोज सानप उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजता होणार्‍या या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संपादक संजय सावंत आणि रायगड आवृत्तीचे निवासी संपादक प्रवीण पुरो यांनी केले आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -