घरताज्या घडामोडीमंत्रालयासमोर जळगावच्या व्यापाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

मंत्रालयासमोर जळगावच्या व्यापाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

Subscribe

जळगाव येथील एका व्यक्तीने पोलिस प्रशासनाच्या कारभाराला कंटाळु मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच दाखवलेल्या समयसूचकतेमुळे हा अनर्थ टळला. या व्यक्तीला मरीन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचा जबाब नोंदवला आहे. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. हा कार्यक्रम संपल्यानंतरच या जळगावच्या या व्यापाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा शेतकरी स्वतःच्या अंगावर केरोसिन टाकून आत्मदहनाच्या प्रयत्नात होता. त्याचवेळी पोलिसांनी याप्रसंगी धाव घेत वेळीच त्या शेतकऱ्याला रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

जळगावच्या जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुकचे सुनिल दामु गुजर या व्यक्तीने मंत्रालयासमोर आज रविवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या अर्जात या शेतकऱ्याने पोलिस प्रशासनाच्या कारभाराला आणि नाकर्तेपणाला कंटाळुन मंत्रालयासमोर आत्मदहन करत असल्याचे म्हटले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून नातेवाईकांची मदत घेऊन सोयाबीन आणि मका खरेदीचा व्यवसाय या व्यक्तीने सुरू केला. तसेच व्यवसायातही चांगली प्रगती केली होती. त्यामुळेच शेतकऱ्यांनी गुजर यांच्यावर विश्वास टाकला. या व्यवसायासाठी राहते घर गहाण ठेवले. मार्केटमधून उसणे पैसे घेऊन मोठ्या प्रमाणात मका आणि सोयाबिन खरेदी केला. पण या व्यवसायातील संबंधित एका तक्रारीमध्ये पोलिसांनी एकतर्फी निर्णय दिल्याची गुजर यांची तक्रार आहे. पोलिसांनी या प्रकरणात आर्थिक तडजोड केली आहे. त्यामुळेच पोलिसांच्या नाकर्तेपणाला कंटाळूनच मी आत्मदहन करत आहे असेही गुजर यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे.

- Advertisement -

आज रविवारी मंत्रालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपताच गुजर यांनी मंत्रालयाच्या गेटमसोरच स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. ही व्यक्ती आत्मदहनाचा प्रयत्न करत असल्याचे दिसताच पोलिसांनी या व्यक्तीकडे तातडीने धाव घेतली आणि त्यांना आत्मदहनापासून रोखले. या संपुर्ण प्रकरणात गुजर यांना मंत्रालय पोलिस आणि मरीन लाईन्स पोलिस यांनी ताब्यात घेतले आहे. या संपुर्ण प्रकरणात मरीन लाईन्स पोलिस पुढील तपास करत आहेत.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -